केवळ 75 मिनिटांत 75 अक्षर गणेश साकारण्याचा विक्रम | पुढारी

केवळ 75 मिनिटांत 75 अक्षर गणेश साकारण्याचा विक्रम

कराड : पुढारी वृत्तसेवा
कराड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र कंटक यांनी ‘मेरा भारत महान’ या शब्दांमधून अक्षर गणेश रेखाटण्याचा विक्रम केला आहे.
भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सगळीकडे मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरे झाले. त्याचेच औचित्य साधून डॉ. कंटक यांनी या विक्रमाची किमया साधली आहे.

यापूर्वी त्यांनी अशाच प्रकारे विक्रमांची नोंद केली आहे. त्याची दखल रेकॉर्ड बुकमध्ये झाली आहे. आपल्या छंदातून काहीतरी करावे या संकल्पनेतून डॉ. कंटक यांनी दि. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 ते 3:45 या 75 मिनिटांमध्ये मेरा भारत महान या शब्दांमधून कॅलिग्राफी मध्ये 75 अक्षर गणेश रेखाटले आहेत. सदर रेकॉर्ड करताना त्यांनी 55 मिनिटांत 75 गणपती रेखाटले व वीस मिनिटांत गणपतीला डिझाईन केले. या उपक्रमाची नोंद रेकॉर्ड बुकमध्ये होणार असून डॉ. कंटक यांचे हे दहावे रेकॉर्ड असेल.

संबंधित बातम्या
Back to top button