166 गावांत मोबाईल टॉवर उभारणार; केंद्राची मान्यता | पुढारी

166 गावांत मोबाईल टॉवर उभारणार; केंद्राची मान्यता

कराड : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यात विस्कळीत झालेली बीएसएनएल सेवा सुरळीत करण्यासाठी खा. श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 166 गावांत हायस्पीड सेवा पुरवण्यासाठी मोबाईल टॉवर उभारले जाणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने तत्वता मान्यता दिली असल्याची माहिती बीएसएनएलच्या अधिकार्‍यांनी खा. श्रीनिवास पाटील यांना कळवली आहे. यासंदर्भात खा. पाटील यांनी लोकसभेत मागणी करून वेळोवेळी पाठपुरावा केला होता. सदर काम पूर्ण झाल्यास मोबाईल सेवेपासून वंचित राहिलेल्या दुर्गम गावांना याचा मोठा फायदा होणार आहे.
यामध्ये जावली तालुक्यातील नेवेकरवाडी (नवीन वसाहत), वेळे, देऊर, वासोटा, मालदेव, तांबी, कारगांव, खिरखंडी, कुसापूर, माडोशी, आडोशी, रवंदी, पाणस पुनर्वसन, भवानीनगर, उंबरवाडी, मुनावळे, वाघळी, निपाणी, वाकी, सातारा तालुक्यातील कोडोली नवीन वसाहत, संभाजीनगर, विलासपूर नवीन वसाहत,
गोडोली पश्चिम, शाहूपूरी दक्षिण, शाहूपूरी पश्चिम, खेड प., जांभगाव, समर्थगाव, जांभळेवाडी पुनर्वसन, आष्टे (नागठाणे), आष्टे पुनर्वसन, करंजोशी, पावनगांव, पळसावडे, सांडवली, केळवली, नावली, धावली, कुडेघर, सावली, भांबवली, जांभे, मोरेवाडी, चिकली, चाळकेवाडी, ठोसेघर, करंजोशी, बोपोशी, दिडावले, नेत्रळ, वेणेखोल, काटवडी खुर्द, कुरूळबाजी, कोरेगाव तालुक्यातील बोरीव नवीन वसाहत, खटाव तालुक्यातील हिंगणे, काटकरवाडी (जयपूर),वाई तालुक्यातील वडोली, किरोंडे,माण तालुक्यातील टाकेवाडी (आंधळी) महाबळेश्वर तालुक्यातील पींपरी तर्फ तांब, म्हाळुंगे, मोरणी, अकल्पे, निवळी, लामज, आरव, शिंदी, चकदेव, वळवण, पर्वत तर्फ वागावळे, उचाट, साळोशी, दोदणी, कांदाट, वानवली तर्फ सोळशी, पाली

हायस्पीड डेटा सेवा
166 गावांना व्हॉइस आणि हाय स्पीड डेटा सेवांसाठी 4 जी सेवा पुरविल्या जाणार आहेत. या गावांमध्ये वीज जोडणीसह 200 चौरस मीटर जमीन अधिग्रहण करणे आवश्यक आहे. ज्या भागात वीज जोडणी तात्काळ शक्य नाही अशा ठिकाणी सोलर पॅनल बसवण्यासाठी 300 चौरस मीटर जमीन आवश्यक आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी या ठिकाणी एक टॉवर उभारला जाईल तसेच आवश्यक उपकरणे बसवून इतर पायाभूत सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी स्थानिकांनी जागा व वीज जोडणीची पूर्तता करताच याठिकाणी पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

  • दुर्गम व वंचित गावांना होणार फायदा
  • डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना होणार लाभ
  • इतर पायाभूत सुविधाही उपलब्ध करणार
  • 166 गावांना फोर जी सुविधा पुरविणार

Back to top button