सातारा : महेंद्र खंदारे : केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पसरलेल्या पश्चिम घाटात भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ व अन्य हजारो प्रजातींचे प्राणी व पक्षी आढळतात. जैवविविधतेच्या या पसार्यातच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा समावेश होते. हजारो किलोमीटर क्षेत्रात पसलेल्या पश्चिम घाटात वाघांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 7 वाघांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. वाघांची वीण (मादी पिल्ले देणे) कर्नाटकातील तिलारी आणि कोल्हापूरातील राधानगरी येथे आहे. सह्याद्रीमुळे वाघांना मोठा आसरा मिळाला आहे.
वन्यजीव विभागाने काही वर्षांपूर्वी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये विविध ठिकाणी जवळपास 45 विष्ठा चे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवलेले होते. त्यामध्ये 7 वाघ असल्याचे दिसून आले आहे, मात्र सह्याद्री मधील वाघ हा एका ठिकाणी स्थायी नाही तो तिलारी ते राधानगरी ते चांदोली ते कोयना ह्या भागामध्ये येतो जातो अगदी एक वाघ तर जो वन्यजीव विभागाने चांदोली मध्ये लावलेल्या कॅमेरा मध्ये पान खख वर टिपलेला हा काही महिन्यानंतर 300 कि मी लांब कर्नाटक मधील अंशी दांडेली येथे केमेरा मध्ये पुन्हा दिसून आला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघासामावेत तेथील अनेक सस्तन प्राण्यांना आसरा मिळालेला आहे. भारतात आढळणार्या 400 प्राण्यांनपैकी सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाचा जंगलात आजमितीस 36 पेक्षा जास्त मांसभक्षी व तृणभक्षी सस्तन प्राण्यांची नोंद झालेली आहे.
प्रमुख मांसभक्षी प्राण्यांमध्ये समृद्ध जंगलाचे प्रतीक वाघ अढळतो, तसेच बिबट्याचा वावर ही मोठ्याप्रमाणावर येथे आहे. ह्याशिवाय रानकुत्री , रानमांजर , कोल्हा , तरस , लेपर्ड केट तृणभक्षी प्राण्यामध्ये बैलकुळातील सर्वात मोठे व वजनदार प्राणी गवा येथे कळपाने आढळतो. भारतातील सर्वात मोठे हरीण सांबर, तसेचे भारतातील सर्वात लहान हरीण गेळाला ही येथे आढळतो. प्रामुख्याने कळपाने राहणारे रानडुक्कर , जंगलातील लाजाळू प्राणी भेकर, वानर टोळी जंगलात सर्वत्र दिसून येतात. अस्वल, खवल्या मांजर, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू, साळींदर, मुंगुस, ससा, असे विविध 36 सस्तन प्राणी आढळतात त्यामुळे येथील अन्नसाखळी मजबूत आहे.
* वाघाचे शास्त्रीय नाव : पान्थेरा टीग्रीस
* भारतातील वाघांचे वजन 100 ते 180 किलो
* वाघाचा वेग ताशी 65 किमी; हत्ती सोडून सर्व प्राण्यांची शिकार वाघ करतो.
* वाघीण एकाचवेळी 3 ते 4 पिलांना जन्म देते.
* वाघाचे आयुष्यमान 20 वर्षे असते