कराडच्या विकासासाठी शासन कटीबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

कराडच्या विकासासाठी शासन कटीबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कराड ; पुढारी वृत्तसेवा : कराड शहराच्या विविध विकास कामांबाबत चर्चा करणेसाठी पालिकेतील सत्तारुढ यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व गटनेते नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सुधीर एकांडे, सचिन पाटील, पवन निकम, प्रदीप साळुंखे, शरद कणसे, राम रेपाळे उपस्थित होते.

राजेंद्रसिह यादव यांनी गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत झालेल्या विकास कामांची माहिती दिली. विशेषः स्वच्छ सर्वेक्षणमध्येे सातत्याने देश पातळीवर झालेल्या गौरवाबाबत त्यांनी आनंद व्यक्त करुन कराड नगर परिषदेने योग्य नियोजनाने केलेल्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. कराड शहराच्या नियोजित विकास कामांची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.

कराड शहराच्या विकास कामात शासन तुमच्या खंबीरपणे पाठीशी राहील याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी राजेंद्रसिह यादव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार केला. तसेच कराडला भेट देण्याची विनंती केली. सातारा दौर्‍यादरम्यान कराडला येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button