गदिमा, बाबुजी आणि मंगेशकर यांचा अमृतसंचय | पुढारी

गदिमा, बाबुजी आणि मंगेशकर यांचा अमृतसंचय

सातारा : पुढारी वृत्तसेवा

आयुष्याच्?या विविध टप्?प्?यांवरील प्रत्?येक रंग गदिमा, बाबुजी आणि मंगेशकर यांच्?या बालगीते, भक्‍तिगीते, चित्रपट गीतांमधून साकारले आहेत. त्यांच्या प्रत्येक गीतातून शब्दांमधील बळ, शब्दांचे महत्त्व आणि किमयेचे महत्त्व उलगडते, त्?यामुळेच त्?यांची गाणी अजरामर आहेत. याच अविस्?मरणीय आणि अवीट गोडीच्?या गाण्यांचा अमृतसंचय दै. ‘पुढारी’च्?या वतीने आयोजित सांगितिक कार्यक्रमात अनुभवता येणार आहे.

शाहू कलामंदिर सातारा येथे रविवारी (दि. 31 ) दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम संपन्‍न होणार आहे. दै. ‘पुढारी’चे वाचक आणि कस्?तुरी क्?लब सातत्?याने दर्जेदार निर्मितीमूल्?य असलेल्या कार्यक्रमांची शृंखला आपल्?या वाचक सभासदांसाठी राबवत असते. यामधील ही एक हटके प्रस्?तुती असणार आहे.

कार्यक्रमात ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर (गदिमा), प्रख्यात संगीतकार सुधीर फडके (बाबुजी) आणि साक्षात सरस्वती ज्या कुटुंबात वास करते असे मंगेशकर कुटुंब या समीकरण असून याद्वारे रसिकांच्?या मनातील याच आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. गदिमांच्?या काही निवडक गीतांच्?या जन्माची कथा, त्?यांच्?या संगीताची कहाणी आणि गायकीचे किस्से खुद्द गदिमांचे सुपुत्र आनंद माडगुळकर आणि मंगेशकर कुटुंबातील गायिका डॉ. राधा मंगेशकर रसिकांना सांगणार आहेत.

संगीतरजनीमध्ये गदिमांनी लिहिलेली गाणी त्?या गीतांना संगीतबद्ध बाबुजींनी केली आहेत आणि त्?यांना आवाज मंगेशकर कुटुंबीयांचा आहे, असा दुग्धशर्करा योग घेऊन हा कार्यक्रम सादर होणार आहे. कार्यक्रमातडॉ. राधा मंगेशकर, मनीषा निश्‍चल, जितेंद्र अभ्यंकर ही गायक मंडळी गाणी सादर करणार असून त्?यांना प्रसन्‍न बाम, अमेय ठाकूरदेसाई, सिद्धार्थ कदम, झंकार कानडे, प्रणव हरिदास हे नामवंत वादक साथसंगत करणार आहेत.

कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा कोल्?हापूर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कार्यक्रम दै. ‘पुढारी’चे वाचक, कस्?तुरी क्?लब सभासद आणि त्?यांच्?या कुटुंबीयांसाठी आहे. कार्यक्रमासाठी मोफत सन्मानिका मिळण्याचे ठिकाण दै. ‘पुढारी’ कार्यालय सातारा, तसेच शाहू कला मंदिर, सातारा येथे आजपासून दि. 27 रोजी सकाळी 10 ते 6 यावेळेत उपलब्ध होणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 8104322958.

Back to top button