सातारा : जिल्ह्याची माहिती घेऊन विकासाला प्राधान्य देणार : रुचेश जयवंशी | पुढारी

सातारा : जिल्ह्याची माहिती घेऊन विकासाला प्राधान्य देणार : रुचेश जयवंशी

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हाधिकारी पदाची सुत्रे रुचेश जयवंशी यांनी स्‍वीकारली आहेत. यावेळी प्रथमच त्‍यांनी ‘दै. पुढारी’सोबत पहिली बैठक घेतली. रुचेश जयवंशी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद पाहिला, हिंगोलीत कोरोना काळात प्रचंड काम केले. प्रशासकीय काम करताना वेगवेगळे अनुभव आले. साताऱ्याच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र पहिल्यांदाच काम करण्याची पहिल्यांदाच त्‍यांना संधी मिळाली आहे. असे ते यावेळी म्‍हणाले.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, विकासाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. जिल्ह्याचा अभ्यास करून लोकांच्या मागणीप्रमाणे विकासाला प्राधान्य देणार, अशी ग्वाही नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी टीम ‘पुढारी’ समवेत बोलताना दिली. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रुचेश जयवंशी यांची पहिली बैठक ‘पुढारी’समवेत झाली. यावेळी दै. पुढारीचे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्तसंपादक हरीष पाटणे, जाहिरात विभाग प्रमुख मिलिंद भेडसगावकर प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button