अखेर सातारा पालिकेने हटवला ‘तो’ धोकादायक पोल | पुढारी

अखेर सातारा पालिकेने हटवला ‘तो’ धोकादायक पोल

सातारा : पुढारी वृत्तसेवा

गोडोली येथील साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय या दरम्यान रस्त्याचे रूंदीकरण झाल्यानंतर विद्युत पोल रस्त्याच्या मधोमध आला होता. महावितरणच्या दुर्लक्षामुळे हा पोल हटत नसल्याने यावर दै. ‘पुढारी’ने आवाज उठवला होता. याची अखेर सातारा पालिकेने दखल घेत बुधवारी हा पोल काढण्यात आला.

गोडोलीतील साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय या मार्गावर काही दिवसांपूर्वी रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले. या कामापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेला विद्युत पोल हटवण्यात यावा, अशी विनंती पालिकेने महावितरणच्या अधिकार्‍यांना केली होती. मात्र, याकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले होते. वारंवार पत्रव्यहार करूनही दुर्लक्ष केल्याने अखेर पालिकेने या रस्त्याचे काम पूर्ण केला. रस्त्याचे काम झाल्याने रस्ता रूंद होवून हा पोल रस्त्याच्या मधोमध आला. त्यामुळे अपघाला निंमत्रण मिळत होते. याबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिध्द केले होते. यावर महावितरणच्या अधिकार्‍यांनी कोणतीही अ‍ॅक्शन घेतली नाही. मात्र, सातारा पालिकेच्यावतीने हा पोल बुधवारी हटवण्यात आला. त्यामुळे नागरिकांना अपघाताची भीती राहिलेली नाही.

Back to top button