पुनर्वसित लोकांचा प्रश्न सुटल्याचा आनंद

कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा
सायगाव ता. कोरेगाव या पुनर्वसित गावातील लोकांना त्यांच्या जमिनी नियमित करणे आणि मालक करण्याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रश्न आता मार्गी लागला असून याचा आनंद आहे, असे प्रतिपादन आ. महेश शिंदे यांनी केले.
कोरेगाव प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी सौ. ज्योती पाटील, तहसिलदार अमोल कदम, नायब तहसिलदार सुयोग बेंद्रे, रणजित जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आ. शिंदे म्हणाले, सायगावमधील पुनर्वसित लोकांना खर्या अर्थाने न्याय देवू शकलो. त्यांच्या जमिनींवर वर्ग 1 व 2 चे शिक्के असल्याने या लोकांना कर्ज मिळत नव्हते. त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा होता. जमिनी नावावर झाल्यानंतर सेप्रेशन करण्याचे काम सुरू करणार आहोत. त्यांची घरे त्यांच्या नावाने होतील व गृहकर्जसुध्दा मिळेल.उर्वरित 22 गावांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकार्यांसोबत बैठक घेवून या प्रश्नाची सोडवणूक करणार आहे.