सातारा : पर्यावरण वारी, फिटनेस वारी, सर्वात भारी सायकल वारी; कोरेगाव-पंढरपूर वारी उत्साहात संपन्न | पुढारी

सातारा : पर्यावरण वारी, फिटनेस वारी, सर्वात भारी सायकल वारी; कोरेगाव-पंढरपूर वारी उत्साहात संपन्न

कोरेगाव ; पुढारी वृत्तसेवा पर्यावरण वारी, फिटनेस वारी इंधन बचत, वेळेची बचत, सायकल वारी हा संदेश देत कोरेगाव सायकल प्रेमी व सातारा जिल्ह्यातील सायकल प्रेमींनी वारी पूर्ण केली. कोरेगाव ते पंढरपूर वारी या सायकल प्रेमींनी उत्‍साहात पूर्ण केली.

सायकलवरून या वारकऱ्यांनी विठ्ठल रखुमाईला प्रदक्षिणा घातली. सर्वत्र आनंदाचे वातावरण, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, प्रदूषण टाळावे आणि सायकलचा जास्तीत जास्त वापर व्हावा, या उद्देशाने सातारा जिल्ह्यातील विशेषतः कोरेगावातील पर्यावरण प्रेमी सायकलस्वार एकत्रित आले. त्यांनी आषाढी सायकलवारीची मुहूर्तमेढ रोवली. रविवारी पंढरपुरात त्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी निर्धार केला. सायकलवरून विठ्ठल रखुमाईला प्रदर्शना घालून त्यांनी नवा विक्रम स्थापन केला. जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी सायकल स्वरांच्या या आषाढी सायकलवारीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

हे ही वाचा :  

Back to top button