सलतेवाडी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान | पुढारी

सलतेवाडी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

तळमावले : पुढारी वृत्तसेवा

अवघ्या 5 वारकर्‍यांवर सुरु झालेल्या दिंडीमध्ये आज 100 हून अधिक वारकरी आणि भक्त सहभागी होत आहेत. हीच वारीची यशस्वीता आहे. श्री समर्थ सदगुरू योगीराज हरिहर महाराज यांच्या प्रेरणेतून माऊली दिंडी सलतेवाडी, ता. पाटण येथून निघते. या गावात श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे मंदीर आहे, त्यामुळे या दिंडीला माऊली दिंडी संबोधले जाते.

दिंडीची सुरूवात सन 1988 साली श्री सदगुरू हरिहर महाराज यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने झाली. गावात माऊलीचे मंदिर आहे म्हणून महाराजांनी जशी आळंदीहून माऊलींची दिंडी निघते त्याच दिवशी आपल्या गावातूनही दिंडी निघावी ही महाराजांनी गावकर्‍यांना प्रेरणा दिली.

दिंडी चालक म्हणून महाराजांचे शिष्य ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली सपकाळवाडी याची नियुक्ती करण्यात आली. दिंडीमध्ये ह.भ.प.बाबूराव महाराज सलते व ह.भ.प.नारायण महाराज सलते यांच्या नियोजनातून कार्यक्रम राबवले जातात. ह.भ.प. रामचंद्र शिबे (गणेश) महाराज, ह.भ.प. खाशाबा चव्हाण या दिंडीचे विणेकरी आहेत. झेंडेकरी म्हणून लक्ष्मण सलते, संतोष काटवटे, आनंदा चव्हाण, काशीनाथ सलते, लक्ष्मण मस्कर, चंद्रकांत अवसरे, दिंडे हे सेवा करतात.

चोपदार म्हणून ह.भ.प. पांडुरंग सलते, ह.भ.प. दिलीप नाईक नवरे, सूरज निगडकर हे सेवा करतात. मंगळवार, दि.21 जून रोजी या पालखीचे सलतेवाडी येथून प्रस्थान झाले आहे. तळमावले येथे शिवसमर्थ संस्थेच्या आवारात पालखीच्या दर्शनाचा लाभ उपस्थितांनी घेतला. पंढरपूरला निघालेल्या भाविकांना शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अ‍ॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्यावतीने चहा, नाष्टा, फराळाचे वाटप करण्यात आले.

Back to top button