सातारा/खंडाळा/महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यासाठी सोमवार घातवार ठरला. यादिवशी तब्बल 3 अपघातांची मालिका घडली असून त्यामध्ये 4 जण ठार झाले. गिर्यारोहण प्रशिक्षणासाठी गेलेल्या ट्रेकर्सच्या बसला हिमाचल प्रदेशात मंडी येथे अपघात होऊन जिल्ह्यातील 7 जण जखमी झाले. महाबळेश्वरमध्ये तीन दुचाकींच्या अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले तर खंडाळ्याजवळ महामार्गावरील एस. कॉर्नरवर ट्रेलर पलटी होऊन दोघांचा मृत्यू झाला.
पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर खंबाटकी बोगदा व एस कॉर्नरच्या उतारावर लोखंडी सळ्या घेऊन निघालेला ट्रेलर सोमवारी पलटी झाला. यामध्ये चालक व क्लिनर दोघेही जाग्यावरच ठार झाले. या अपघात सूरज हैदर शेख (वय 24), विष्णू गोपाळ सूरनर (22, दोघेही रा. वेळेगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी सव्वा सातच्या दरम्यान हा अपघात झाला. बेंगरूटवाडी गावाजवळ महामार्गावरून पुणे बाजूकडे जात असणार्या रामदास ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचा ट्रेलर (क्र. एम.एच. 46 एच. 5159) चा अपघात झाला. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असणार्या तीव्र उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे धोम बलकवडी कॅनॉलच्या वळणावर ट्रेलर रस्ता सोडून बाजूला गेला. पुढे चढ व दगडात ट्रेलर पलटी होणार या भीतीने क्लिनरने उडी टाकली. मात्र, दुर्देवाने तो चाकाखाली येऊन चिरडला गेला. तर ट्रेलर चढावर जाऊन पलटी झाला. यात सळ्या केबिनमध्ये घुसल्याने केबिनसह चालकाचा चुराडा झाला.
महाबळेश्वर शहरापासून अंदाजे एक किमी अंतरावर महाड रस्त्यावर हॉटेल अप्सरा ते महाड नाका परिसरातील अवघड वळणावर तीन दुचाकींची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाले तर अन्य दोन युवक जखमी झाले. रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महाबळेश्वर येथून महाडच्या दिशेने एक दुचाकी (क्र. एम एच 13 सीआर 7193) भरधाव वेगाने निघाली होती. या दुचाकीची धडक समोरून येणार्या दोन दुचाकींना (क्र. एमएच 12 सीडब्यू 2767 व एम एच 11 सी आर 3744) बसून हा भीषण अपघात झाला. या अपघातात जुबेर मुस्तफा मानकर (रा. नगरपालिका सोसा.,महाबळेश्वर) व आकाश तानाजी भोसले (रा. मंगळवेढा ता. पंढरपूर जि.सोलापूर) हे दोन युवक जागीच ठार झाले. तर अमिन बिस्मिल्ला शेख (रा. महाबळेश्वर )व दरिबा सुनिल बळवंतराय (रा. मंगळवेढा) हे दोघे जखमी झाले.
मनाली येथे गिर्यारोहण प्रशिक्षणासाठी गेलेल्या ट्रेकर्सच्या बसला हिमाचलप्रदेश येथील मंडी येथे अपघात झाला. सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्यावतीने प्रशिक्षण पूर्ण करून साताराकडे परतत असताना सोमवारी पहाटे ही दुर्घटना घडली. या अपघातामध्ये सहा ते सात जण जखमी झाले आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्यावतीने 26 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी महाबळेश्वर, सातारा, जावली व पाटण तालुक्यातील 50 युवकांना बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्ससाठी मनाली येथे पाठवण्यात आले होते. यामध्ये आ. शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्स व महाबळेश्वर ट्रेकर्समधील युवकांचा समावेश आहे. हे सर्व युवक दि. 8 मे रोजी मनाली येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. 26 दिवसांचा प्रशिक्षण कालावधी शासनाच्या गिर्यारोहण इन्स्टिट्यूटमध्ये पार पडल्यानंतर हे सर्वजण सोमवारी पहाटे परतीच्या प्रवासाला लागले होते. पहाटे पाचच्या सुमारास हिमाचल प्रदेशमधील विलासपूर जिल्ह्यातील मंडी येथे दोन ट्रॅव्हल्सची समोरा समोर जोराची धडक झाली.
या अपघातात प्रशिक्षणासाठी गेलेल्या ट्रेकर्समधील काही ट्रेकर्स जखमी झाले. या अपघातात वाहनाचा चालक जखमी झाला असून प्रशिक्षणासाठी गेलेले 50 युवक व त्यांच्या सोबत असलेले जिल्हा परिषदेचे दोन प्रतिनिधी सुखरूप आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विलासपूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. या युवकांना दुसर्या बसमधून नवी दिल्ली येथे आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व युवक दि. 7 जून रोजी दिल्ली येथून रेल्वेने सातारा येथे येण्यासाठी निघणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली.
महाबळेश्वर शहरापासून अंदाजे एक किमी अंतरावर महाड रस्त्यावर हॉटेल अप्सरा ते महाड नाका परिसरातील अवघड वळणावर तीन दुचाकींची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाले तर अन्य दोन युवक जखमी झाले. रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महाबळेश्वर येथून महाडच्या दिशेने एक दुचाकी (क्र. एम एच 13 सीआर 7193) भरधाव वेगाने निघाली होती. या दुचाकीची धडक समोरून येणार्या दोन दुचाकींना (क्र. एमएच 12 सीडब्यू 2767 व एम एच 11 सी आर 3744) बसून हा भीषण अपघात झाला. या अपघातात जुबेर मुस्तफा मानकर (रा. नगरपालिका सोसा.,महाबळेश्वर) व आकाश तानाजी भोसले (रा. मंगळवेढा ता. पंढरपूर जि.सोलापूर) हे दोन युवक जागीच ठार झाले. तर अमिन बिस्मिल्ला शेख (रा. महाबळेश्वर )व दरिबा सुनिल बळवंतराय (रा. मंगळवेढा) हे दोघे जखमी झाले.
मनाली येथे गिर्यारोहण प्रशिक्षणासाठी गेलेल्या ट्रेकर्सच्या बसला हिमाचलप्रदेश येथील मंडी येथे अपघात झाला. सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्यावतीने प्रशिक्षण पूर्ण करून साताराकडे परतत असताना सोमवारी पहाटे ही दुर्घटना घडली. या अपघातामध्ये सहा ते सात जण जखमी झाले आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्यावतीने 26 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी महाबळेश्वर, सातारा, जावली व पाटण तालुक्यातील 50 युवकांना बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्ससाठी मनाली येथे पाठवण्यात आले होते. यामध्ये आ. शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्स व महाबळेश्वर ट्रेकर्समधील युवकांचा समावेश आहे. हे सर्व युवक दि. 8 मे रोजी मनाली येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. 26 दिवसांचा प्रशिक्षण कालावधी शासनाच्या गिर्यारोहण इन्स्टिट्यूटमध्ये पार पडल्यानंतर हे सर्वजण सोमवारी पहाटे परतीच्या प्रवासाला लागले होते.
पहाटे पाचच्या सुमारास हिमाचल प्रदेशमधील विलासपूर जिल्ह्यातील मंडी येथे दोन ट्रॅव्हल्सची समोरा समोर जोराची धडक झाली. या अपघातात प्रशिक्षणासाठी गेलेल्या ट्रेकर्समधील काही ट्रेकर्स जखमी झाले. या अपघातात वाहनाचा चालक जखमी झाला असून प्रशिक्षणासाठी गेलेले 50 युवक व त्यांच्या सोबत असलेले जिल्हा परिषदेचे दोन प्रतिनिधी सुखरूप आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विलासपूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. या युवकांना दुसर्या बसमधून नवी दिल्ली येथे आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व युवक दि. 7 जून रोजी दिल्ली येथून रेल्वेने सातारा येथे येण्यासाठी निघणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली.