‘पुढारी एज्युदिशा’ प्रदर्शनाचा आज शानदार प्रारंभ

‘पुढारी एज्युदिशा’ प्रदर्शनाचा आज शानदार प्रारंभ
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

'पुढारी एज्युदिशा' प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आता करिअर संधीचे नवे दालन शुक्रवार दि. 3 पासून खुले होत आहे. 3 ते 5 जून या कालावधीत सातार्‍यातील पोलिस करमणूक केंद्रात होत असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक क्षेत्रातील करिअरच्यादृष्टीने बहुविध माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटांचा नवीन खजिना उपलब्ध होणार आहे.

दै. 'पुढारी' आयोजित व संजय घोडावत युनिर्व्हसिटी प्रस्तुत 'एज्युदिशा 2022' या शैक्षणिक प्रदर्शनाचे 3 ते 5 जून या कालावधीत येथील अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र, सातारा येथे आयोजन करण्यात आले आहे. पॉवर्ड बाय स्पॉन्सर आयआयबी – पीसीबी लातूर असणार आहेत. सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिर्व्हसिटी, पुणे व प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी क्लासेस, लातूर आहेत.

अजिंक्य डी.वाय.पाटील युनिर्व्हसिटी, पुणे व सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिर्व्हसिटी, पुणे हे सहप्रायोजक आहेत. येथील पोलिस करमणूक केंद्रात सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन होणार आहे. यावेळी संजय घोडावत युनिर्व्हसिटीचे विश्वस्त विनायक भोसले, संजय घोडावत युनिर्व्हसिटीचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील, आयआयबी-पीसीबी लातूरचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रा. चिराग सेन्मा, एमआयटी-एडीटी युनिर्व्हसिटीचे प्रोजेक्ट डायरेक्टर सुराज भोयर, प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी क्लासेस, लातूरचे प्रा. प्रमोद घुगे तसेच अजिंक्य डी.वाय.पाटील युनिर्व्हसिटीचे थॉमस अघमकर, सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिर्व्हसिटी पुणेचे गणेश लोहार, दै. 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, दै. 'पुढारी' साताराचे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्तसंपादक हरीश पाटणे, जाहिरात व्यवस्थापक मिलिंद भेडसगावकर, इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचेही मार्गदर्शन होणार आहे.

उद्घाटनानंतर प्रदर्शनातील पहिल्या सत्रास 12.15 वाजता संजय घोडावत युनिर्व्हसिटीचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या व्याख्यानाने प्रारंभ होणार आहे. नंतर संजय घोडावत युनिर्व्हसिटीचे कुलगुरु डॉ. अरुण पाटील यांचे 'उच्च शिक्षणाचे महत्व, आव्हाने व संधी' या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी 4 ते 5 या वेळेत 'रोजगार आणि रोजगारभिमुकता' या विषयावर एमआयटी-एडीटी युनिर्व्हसिटीचे प्रोजेक्ट डायरेक्टर सुराज भोयर मार्गदर्शन करतील. सायं. 5 ते 6 यादरम्यान सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिर्व्हसिटी, पुणेच्या डॉ. अर्चना ऐनापुरे यांचे 'कौशल्य विकासाचे महत्व' या विषयावर व्याख्यान होणार आहे.

दै. 'पुढारी' आयोजित 'एज्यु दिशा 2022' हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी दिशादर्शक ठरणार आहे. तीन दिवस चालणार्‍या या ज्ञानसत्रात करिअरविषयक विविध तज्ञांची अचूक मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांच्याही मनात असणार्‍या अनेक शकांचे निरसन तीन दिवस चालणार्‍या प्रदर्शनातून होणार आहे. प्रदर्शनाने करिअरच्या हजारो वाटा विद्यार्थी-पालकांसाठी खुल्या होणार आहेत. या प्रदर्शनाबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

यूपीएससीत चमकलेल्या जिल्ह्यातील ज्ञानवंतांचा जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते सत्कार

दै. 'पुढारी'च्या 'एज्यु दिशा 2022' या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी यूपीएससी स्पर्धा परीक्षेत सातारा जिल्ह्यातील चमकलेल्या ज्ञानवंतांचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यूपीएससीमध्ये नेत्रदीपक यश मिळवलेल्या सनपाने (ता. जावली) येथील ओमकार मधुकर पवार, सातारा येथील ओमकार राजेंद्र शिंदे, कराड येथील रणजित मोहन यादव, भांडवली (ता. माण) येथील अमित लक्ष्मण शिंदे यांचा जिल्हाधिकारी 'पुढारी'च्यावतीने उद्घाटन समारंभात गौरव करणार आहेत.

प्रदर्शनातील आजची व्याख्याने

11 वाजता : उद्घाटन व जिल्हाधिकार्‍यांचे मार्गदर्शन
11.45 ते 12 : प्रेरणादायी भाषण (विनायक भोसले)
12 ते 1 : उच्च शिक्षणाचे महत्त्व, आव्हाने व संधी (डॉ.अरुण पाटील)
4 ते 5 : रोजगार आणि रोजगाराभिमुकता (सुराज भोयर)
5 ते 6 : कौशल्य विकासाचे महत्त्व (डॉ. अर्चना ऐनापुरे)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news