सातारा : देशसेवेतून स्वगृही परतलेल्या जवानांचे शिवतीर्थावर स्वागत (व्हिडिओ) | पुढारी

सातारा : देशसेवेतून स्वगृही परतलेल्या जवानांचे शिवतीर्थावर स्वागत (व्हिडिओ)

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यातील सैनिक देशसेवा करून स्वगृही परतला असल्याने त्याचे स्वागत करण्यात आले. फर्स्ट मराठा जंगी पलटण येथे २४ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या ३ जवानांचे जंगी स्वागत त्यांच्या कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी केलंय. पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर जवानांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सातारी कंदी पेढे वाटप करण्यात आले. या अनोख्या स्वागत सत्काराने जवान भारावून गेले. देशाची सेवा केली असल्याचा अभिमान यावेळी जवानांनी व्यक्त केला.

पाकिस्तानने जेव्हा जेव्हा नापाक कारवाया केल्या तेव्हा आम्ही त्यांच्याशी दोन हात केले.

– सिंचम भोसले, सेवानिवृत्त जवान

Back to top button