सातारा : झेडपीत 28 अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या | पुढारी

सातारा : झेडपीत 28 अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा परिषदेच्या कृषि, पशुसंवर्धन, एकात्मिक बाल विकास, बांधकाम उत्तर व शिक्षण विभागाच्या सुमारे 28 अधिकारी व कर्मचार्‍यांच्या समुपदेशनाने बदल्या झाल्या.

जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात बुधवारपासून कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्या उपस्थितीत सुरु आहेत.

गुरुवार दि. 26 मे रोजी कृषि विभागातील विस्तार अधिकारी प्रशासकीय 1, विनंती 1 व आपसी 2 अशा मिळून 4 बदल्या झाल्या. पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी प्रशासकीय 1 व विनंती 2 अशा 3 बदल्या झाल्या.पशुधन पर्यवेक्षकांच्या प्रशासकीय 3, विनंती 3, आपसी 2 अशा 8 बदल्या झाल्या. एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागातील पर्यवेक्षिकांच्या प्रशासकीय 3, विनंती 1, आपसी 2 अशा 6 बदल्या झाल्या .

बांधकाम विभाग उत्तरमधील कनिष्ठ अभियंता प्रशासकीय 1, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक विनंती 1 बदली झाली. प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी प्रशासकीय 2, आपसी 2 अशा 4 बदल्या झाल्या. केंद्रप्रमुख विनंती 1 बदली झाली. सर्व विभागाच्या मिळून प्रशासकीय 11, विनंती 9 व आपसी 8 अशा मिळून 28 बदल्या झाल्या असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दिली. यावेळी कृषि विकास अधिकारी विजय माईनकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, महिला व बाल कल्याण अधिकारी रोहिणी ढवळे, बांधकाम उत्तरचे कार्यकारी अभियंता अभय पेशवे, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर व अन्य अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शुक्रवार दि. 27 रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या बदल्या होणार आहेत.

Back to top button