सातारा : कराड दक्षिणेत खरीप पूर्व मशागतींच्या कामांना वेग | पुढारी

सातारा : कराड दक्षिणेत खरीप पूर्व मशागतींच्या कामांना वेग

येळगाव : पुढारी वृत्तसेवा :  कराड दक्षिणमधील येळगांव, येवती, काळगांवसह डोंगरी विभागात खरीप पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

डोंगरी भागात यावर्षी उन्हाळी पाऊस चांगले झाल्याने ऐन उन्हाळ्यात धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला. साहजिकच हा पाऊस खरीप हंगामपूर्व मशागतीसाठी उपयुक्त ठरला आहे. सध्या सर्वत्र खरीप पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. खरिपांतर्गत घेण्यात येणार्‍या आणि मुख्य पीक असणार्‍या भात पिकासह हायब्रीड, भुईमूग, सोयाबीन, मका, कडधान्ये आदी पिकांची लागवड ही कोरड्या मातीत म्हणजेच धूळवाफेवर करावी लागते. एप्रिल व मे महिन्यातच नांगरट, बांधबंदिस्ती, शेणखत ओढणे, कुळवणी आदी खरीप हंगाम पूर्व मशागतींची कामे उरकली जातात. या कामात सध्या शेतकरी वर्ग गुंतला आहे. काही ठिकाणी धूळवाफेवर पेरणीची कामे सुरू झाली आहेत.

दरम्यान कराड दक्षिणचे शेवटचे टोक असणार्‍या येणपे, गुढे, शेवाळेवाडी या डोंगरी विभागात भात पेरणी सुरू झाली आहे. मनुष्य बळाने कुरीच्या सहाय्याने भाताची पेरणी केली जात आहे.

Back to top button