सातारा आगारात एसटी कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी | पुढारी

सातारा आगारात एसटी कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी

सातारा : पुढारी वृत्तसेवा
मानव सुरक्षा संघ सातारा जिल्हा पश्‍चिम महाराष्ट्र विभागातर्फे कामगार दिनाचे औचित्य साधून सातारा बसस्थानकात आयोजित केलेल्या आरोग्य शिबीरात 114 हून अधिक एसटी कर्मचार्‍यांच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.

शिबीराचे उद्घाटन स्थानक प्रमुख सौ. रेश्मा गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीरात नेत्र तपासणी, ब्लडप्रेशर, हिमोग्लोबीन, डायबेटीक्स तपासणी करण्यात आली. मानसोपचार तज्ञाकडून समुपदेशन करण्यात आले. तसेच मेडीकल हेल्थकार्डचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. 9 वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पथकाने एसटी कर्मचार्‍यांच्या विविध प्रकारच्या तपासण्या केल्या. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष रितेश ननावरे, महिला उपाध्यक्षा सौ. सारीका तपासे, जिल्हा प्रमुख अनुप जोशी, सौ. रुपाली माने, ज्योत्स्ना मुल्या, सौ. अर्चना धडचिरे, चेतन काटकर, सौ. निता फडतरे, सौ. शितल इंगवले, साळुंखे व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button