कराडच्या प्रीतिसंगमात बुडून युवकाचा मृत्यू | पुढारी

कराडच्या प्रीतिसंगमात बुडून युवकाचा मृत्यू

कराड : पुढारी वृत्तसेवा

येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगममध्ये बुडून युवकाचा मृत्यू झाला. बुधवार दिनांक 27 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कैलास तुकाराम प्रजापती (वय 17, रा. सोमवार पेठ, कराड) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कैलास प्रजापती हा युवक बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी प्रीतिसंगमावर गेला होता. पोहत असताना तो नदीत बुडू लागला. ही बाब लक्षात येताच सकाळी नदीवरती पोहण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी त्याला त्वरीत नदीपात्रातून बाहेर काढले व उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याबाबतची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

Back to top button