उदयनराजे भोसले म्‍हणाले, ‘ईडी’ माझ्या ताब्यात द्या; मग दाखवतो सगळ्यांना’ | पुढारी

उदयनराजे भोसले म्‍हणाले, 'ईडी' माझ्या ताब्यात द्या; मग दाखवतो सगळ्यांना'

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सध्या राज्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्‍या राजकीय घडामोडींवर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्‍हणाले, “सध्याचे राजकीय वातावरण कुणी बिघडवले याचा विचार केला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. मला कार्टून नेटवर्कवरील टॉम अँड जेरी आवडतं; पण सध्या मी ते बघायचे बंद केले आहे. राज्‍यातील काही नेत्‍यांच्‍या ज्‍या माकड उड्या चालल्या आहेत त्या बघत बसतो. कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला आत टाकतंय हे बघतो. खूप मजा येते.”

Vijay Babu : विजय बाबूवर लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल, फेसबुक लाईव्हनं केला खुलासा

कोण म्हणतंय तो मुख्यमंत्री आहे का? कोल्हापूरची सभा उत्कृष्ट झाली, लोक भरपूर आले, पण तुमची डिलीवरी काय होती? तर झिरो असेही ते म्‍हणाले.

“या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत, माझ्या हातात ईडी द्या, मग दाखवतो यांना. ही ‘ईडी’ची चेष्टा झाली आहे. पानपट्टीवर बिडी मिळते तशी अवस्था ‘ईडी’ची झाली आहे. लावा ना ईडी. घ्या ताब्यात सगळे. यांना दांडक्याने सडकून काढले पाहिजे, असेही ते म्‍हणाले.

 एका बाजूला फुटपाथवर लोक झोपत आहेत, या लोकांना दिसत नाही का? प्रत्येकाने एकमेकांची पाठ थोपटायची, जेलमध्ये आहे तरी त्याने काही केले नाही. दीड वर्ष, दोन वर्ष जेलमध्ये पण त्याने काही केले नाही म्हणायचे.

उदयनराजे भोसले : लोकांना डोळे नाही, लोकांना मेंदू नाही

लोकांना डोळे नाही, लोकांना मेंदू नाही, लोक हसतायत, असं ते म्हणाले. जर निवडणुका लागल्या तर हे कसे उभारणार हे त्यांचे त्यांनाच माहिती. माझ नाव घ्यायचे नाही, मी कुणाच्या नादाला लागत नाही, असंही ते म्हणाले.

गेली चार वर्षापेक्षा जास्त कालावधीत सुरु असलेल्या कास धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरु असून हे काम यंदाच्या पावसाळ्याआधी पूर्ण होईल का याबाबत सातारकरांकडून प्रश्न उपस्थित केला जात होता. सध्याच्या कामाची स्थिती काय आहे. सध्याच्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी संबधित विभागाचे अधिकारी यांना उदयनराजे भोसले यांनी बोलावून मिटिंग केली. दरम्यान अडचणीवर चर्चा करताना त्यांनी काही अधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कास धरणाचे काम हे येत्या २० मे पर्यंत संपलेले असेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Back to top button