सातारा : भाजप आमदार जयकुमार गोरेंवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल | पुढारी

सातारा : भाजप आमदार जयकुमार गोरेंवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सातारा : पुढारी वृत्तसेवा : भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष व माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे व त्यांच्या साथीदारांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मयत व्यक्तीलाच जिवंत दाखवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

आमदार गोरे यांच्यासह दत्तात्रय कोंडिबा घुटुकडे (रा. विरळी ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल) व अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दस्तांची नोंदणी करताना त्यांनी आधारकार्डची छेडछाड केली आहे. बनावट आधार कार्ड तयार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button