सातारा महामार्ग : शिवशाही बस जळून खाक; सुदैवाने 40 प्रवासी बचावले | पुढारी

सातारा महामार्ग : शिवशाही बस जळून खाक; सुदैवाने 40 प्रवासी बचावले

सारोळा : पुढारी वृत्तसेवा
पुणे-सातारा महामार्गावर सांगलीहून पुण्याला चाललेल्या शिवशाही बसमधून अचानक धूर येऊन तिने पेट घेतला. बस पूर्णपणे जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील 40 प्रवाशांचे प्राण सुदैवाने वाचले. मात्र, महामार्गावर आगीचे तांडव पाहण्यास मिळाले. निगडे (ता. भोर) राजगड साखर कारखान्यासमोरील उड्डाणपुलावर सोमवारी दुपारी ही घटना घडली.

सांगली-स्वारगेट शिवशाही बस सांगलीतून सकाळी प्रवाशांसह निघाली होती. पुणे-सातारा महामार्गावर निगडे गावच्या उड्डाणपुलावर अचानक गाडीतून धूर येऊ लागला. गाडीचालक शेरअली सिराज फकीर यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने गाडी थांबवली व गाडीतील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. थोड्याच वेळात गाडीने पेट घेतला. सर्व प्रवासी जीवाच्या आकांताने बसबाहेर धावल्याने त्यांचे प्राण बचावले.

हेही वाचलत का?

Back to top button