सातारा : खोटे सोने विक्री करणार्‍या तिघांवर गुन्हा | पुढारी

सातारा : खोटे सोने विक्री करणार्‍या तिघांवर गुन्हा

लोणंद : पुढारी वृत्तसेवा : खोट्या सोन्याच्या बांगड्यांची विक्री करून खर्‍या सोन्याची चैन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणंदमधील विजय शिंदे यांच्या वैष्णवी ज्वेलरी शॉपमध्ये केतन बाळकृष्ण क्षीरसागर (वय 32, रा. अपशिंगे (मि), छबूबाई सुभाष धर्माधिकारी व किरण सुभाष धर्माधिकारी ( दोघेही रा. धूळदेव, ता. फलटण) यांनी खोट्या सोन्याच्या बांगड्या आणून त्या खर्‍या असल्याचे दाखवत सोन्याची चैन खरेदी करण्याचा प्रयत्न केला. ही बाब शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचलंत का? 

Back to top button