गुड न्यूज; सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट घसरतोय | पुढारी

गुड न्यूज; सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट घसरतोय

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट घसरत आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. बाधित, बळी व पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.

रविवारी असलेल्या पॉझिटिव्हिटी रेट डाऊन होत तो 6 टक्क्यावर आला आहे. सोमवारी 570 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, 11 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1299 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख आजही सुरू असून मार्च महिन्यात सुरू झालेली दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. बाधित, बळी आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाधित आकडा 800-900 च्या घरात तर बळी 20-25 इतके जात होते.

आरोग्य यंत्रणेकडून टेस्टिंग प्रमाण वाढवल्याने बाधित आढळत आहेत. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेटही स्थिर होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाधित आकडा कमी झाला असून पॉझिटिव्हिटी रेट हा 6 टक्केच्या घरात आला आहे. दिवसेंदिवस पॉझिटिव्हिटी रेट कमी येत असल्याने साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेले 15 दिवस बंद असलेला सातारा जिल्हा पुढील आठवड्यात सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सोमवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जावली 13, कराड 108, खंडाळा 38, खटाव 59, कोरेगांव 52, माण 36, महाबळेश्वर 11, पाटण 21, फलटण 54, सातारा 136, वाई 36 व इतर 6 असे बाधित आढळले आहेत. तर आज अखेर जिल्ह्यात 2 लाख 9 हजार 30 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. तर कराड 2, खटाव 1, कोरेगांव 1, माण 1, पाटण 1, फलटण 2, सातारा 3 अशा 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 5 हजार 54 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Back to top button