सकल मराठा समाजाचा कडेगांव प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा | पुढारी

सकल मराठा समाजाचा कडेगांव प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

कडेगाव ; पुढारी वृत्तसेवा एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच, जालना घटनेचा जाहीर निषेध असो, अशा घोषणाबाजी करीत सकल मराठा समाजाच्यावतीने कडेगांव प्रांताधिकारी कार्यालावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो मराठा बांधव उपस्थीत होते. या शिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देत कडेगांव शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. कडेगांव शहरासह तालुक्यातील मराठा बांधव आक्रमक झाले. जालना घटनेच्या निषेधार्थ शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी (दि. 5 सप्टेंबर) रोजी सकाळी 10 वाजता सकल मराठा समाज कडेगांव येथील छत्रपती शिवाजी चौक येथे एकत्र येवून मोर्चास सुरुवात झाली.

भगवा झेंडा हातात घेवून व भगव्या टोप्या परिधान करीत मराठा बांधवांनी मोर्चास आगेकूच केली. जालना घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. तर काळ्या फिती दंडावर बांधून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचताच आक्रमक झालेले अनेक मराठा बांधव व भगिनींनी आपले मनोगत व्यक्त करीत प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला. तहसीलदार अजित शेलार यांनी यावेळी निवेदन स्वीकारले.

हेही वाचा : 

Back to top button