सांगली : विट्यात दोन गटात जोरदार हाणामारी

सांगली : विट्यात दोन गटात जोरदार हाणामारी
Published on
Updated on

विटा, पुढारी वृत्तसेवा : विट्यात जुन्या वादातून रविवारी रात्री उशिरा तलवार, चाकू, काठ्या, कुर्‍हाडीचा वापर करून दोन गटांत राडा झाला. यात दोघे जखमी झाले. अमित टकले आणि सत्यम पवार अशी जखमींची नावे आहेत.

सत्यम पवार यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहम माणिक ठोकळे, मयूर आदाटे, रोहित जावीर, सागर अरविंद पवार, राज ऊर्फ रोहन किरण जावीर आणि चिंगळ्या उर्फ प्रशांत विजय गायकवाड (सर्व रा. विटा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

रविवारी रात्री जुना वासुंबे रस्त्याच्या परिसरात सत्यम पवार हे त्याच्या घरासमोर अमित टकले आणि अन्य काही मित्रांसोबत बोलत बसले होते. त्यावेळी सोहम, मयूर, रोहित, सागर, राज आणि प्रशांत हे मोटारसायकलीवरून तिथे आले. मयूर आदाटे याने अमीत टकले यांना शिवीगाळ करीत पोटात चाकूने वार केला. सत्यम पवार यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना राज जावीर याने त्यास कुर्‍हाडीच्या दांड्याने मारून जखमी केले. त्यानंतर सोहम, सागर आणि प्रशांत या तिघांनी सत्यम आणि अमित यांना काठ्यांनी मारहाण केली. रोहित जावीर याने तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला.

या हाणामारीत अमित हा गंभीर जखमी झाला असून त्याला सांगलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी रात्री विटा पोलिस ठाण्यामध्ये सत्यम पवार याने फिर्याद दिली. संशयित सहा जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news