सांगली : वाठार किरोलीच्या दोघांचा चाकणमध्ये खून

सांगली : वाठार किरोलीच्या दोघांचा चाकणमध्ये खून
Published on
Updated on

कोरेगाव; पुढारी वृत्तसेवा :  चाकण औद्योगिक वसाहतीमधील सावरदरी (ता. खेड) येथे महिलेच्या छेडछाडीचा जाब विचारायला गेलेल्या दोघांचा एकाने धारदार शस्त्राने खून केला. खून झालेले दोघेही मूळचे सातारा जिल्ह्यातील वाठार किरोली, ता. कोरेगाव येथील आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सूरज नंदकुमार चव्हाण (वय 27, सध्या रा. सावरदरी) आणि अनिकेत किसन पवार (वय 24 वर्षे, सध्या रा. सावरदरी) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी छेडछाड केलेल्या महिलेच्या फिर्यादीवरून संशयित प्रदीप दिलीप भगत ( सध्या रा. सावरदरी) याच्यावर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीमधील सावरदरी गावामध्ये खून झालेले सूरज, अनिकेत व संशयित प्रदीप भगत हे भाडेकरू म्हणून राहत आहेत. सूरज चव्हाण हा आपल्या कुटुंबासह राहत आहे. यापूर्वी संशयित प्रदीप हा फिर्यादीच्या शेजारील महिलेची वारंवार छेड काढत होता. प्रदीप याने शनिवारी त्या महिलेच्या बाथरूमची खिडकी फोडली. याचा जाब विचारण्यासाठी सूरज आणि अनिकेत हे प्रदीप याच्याजवळ गेले. यावरून तिघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी प्रदीपने धारदार शस्त्राने सूरज व अनिकेत यांच्यावर
सपासप वार केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news