सांगली : दुचाकीसह विहिरीत पडून मुलीचा मृत्यू , युवक बचावला

file photo
file photo

तासगाव; पुढारी वृत्तसेवा :  अल्पपवयीन प्रेमी युवक आणि युवती हे मोटारसायकलसह विहिरीत पडल्याने युवतीचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला तर युवक बचावला आहे. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील एका गावात घडल्याने खळबळ माजली आहे. या घटनेची तासगाव पोलिसांत नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी : यातील अल्पवयीन युवक हा तालुक्यातीलच एका गावातील आहे. त्याची मावशी तालुक्यातील एका गावात राहते. काही कारणाने त्याचे मावशीकडे जाणे-येणे होते. मावशीच्या जवळपास ती युवती राहत होती. यातून त्याचे सूत जमले. त्यांच्यात भेटीगाठी सुरू झाल्या. सोमवारी मध्यरात्री या प्रेमीयुगुलाची भेट झाली. त्यांनी गावाबाहेर निवांत ठिकाणी जाऊन बसण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे अल्पवयीन प्रेमीयुगुल गावाशेजारी असणार्‍या एका ठिकाणी जाऊन बसले. काही वेळानंतर त्या युवतीला घरी सोडण्यासाठी ते दोघेजण मोटार सायकल वरून घरी परतत होते. वाटेत अंधार असल्याने युवकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्याशेजारी असणार्‍या विहिरीत ते दोघेजण मोटारसायकलसह कोसळले.

युवकाला पोहता येत असल्याने तो बचावला व अंधार्‍या रात्री तो विहिरी बाहेर आला.पण त्या युवतीला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर युवतीच्या पालकानी तासगाव पोलिसात संबंधित युवकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे अशी माहीती तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल शेळके यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news