सांगली : प्रारूप प्रभाग रचना 2 जूनला प्रसिद्ध होणार

सांगली : प्रारूप प्रभाग रचना 2 जूनला प्रसिद्ध होणार

सांगली : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना 2 जूनला प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 2 ते 8 जून या दरम्यान हरकती व सूचना मांडता येणार आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्त यांच्याकडून अंतिम प्रभाग रचना 22 जूनला करून अंतिम प्रभाग रचना 27 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. प्रभाग रचना, आरक्षण यामुळे निवडणूक सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात तातडीने निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानंतर आयोगाने प्रत्येक जिल्ह्याला तातडीने माहिती देण्यास सांगितले होते. जिल्ह्यातून माहिती सादर करण्यात आली आहे. त्यात नव्याने आठ मतदारसंघ वाढून 68 गट होणार आहेत. कवठेमहांकाळ आणि कडेगाव तालुके वगळता उर्वरित आठ तालुक्यात प्रत्येकी एक मतदारसंघ वाढले आहेत. त्याशिवाय पंचायत समितीचे गण 136 होणार आहेत. नव्याने प्रभाग रचनेनुसार मतदारसंघातील लोकसंख्या, मतदारसंख्या आणि नकाशा सादर करण्यात आला. राज्यातून माहिती आल्यानंतर मतदारसंघाची प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना 2 जूनला प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 2 ते 8 जून या दरम्यान हरकती व सूचना मांडता येणार आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्त यांच्याकडून प्रभाग रचना 22 जूनपर्यंत निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यानंतर 27 जून रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहेत. निवडणूक तातडीने घेण्याचे आदेश असले तरी प्रभाग रचना, हरकती, आरक्षण यामुळे निवडणूक लांबण्याची शक्यता आहे.

सन 2017 च्या निवडणुकीतील पक्षीय बल

गेल्या वेळी सन 2017 च्या निवडणुकीत झालेल्या निवडणुकीत कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. भाजप -23, राष्ट्रवादी- 14, काँग्रेस-10, रयत क्रांती संघटना-4, शिवसेना -3, अपक्ष- 3, स्वाभिमानी विकास आघाडी- 2, शेतकरी स्वाभिमानी संघटना -1

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news