सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेत सत्तांतर

सांगली :  प्राथमिक शिक्षक बँकेत सत्तांतर
Published on
Updated on

सांगली/मिरज;  पुढारी वृत्तसेवा :  सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिक्षक समिती पुरस्कृत पुरोगामी मंडळाचा धुव्वा उडाला. विरोधी स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या पॅनेलचे 21 पैकी 20 उमेदवार निवडून आले. सत्ताधारी गटाचे कृष्णा पोळ हे एकमेव उमेदवार निवडून आले. बारा वर्षानंतर बँकेमध्ये सत्तांतर झाले आहे.
निवडणुकीनंतर विजयी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ढोल, ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली.

बँकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही गटाचे प्रत्येकी 21 आणि दोन अपक्ष असे 44 जण निवडणूक रिंगणात होते. शिक्षक समिती पुरस्कृत सत्ताधारी पुरोगामी पॅनेलला स्व. शि. द. पाटील (माधवराव पाटील) यांच्या शिक्षक संघाच्या गटाबरोबर शिक्षक भारती, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ, राज्य उर्दू संघटना, शिक्षक सहकार संघटनेने पाठिंबा दिला होता. विरोधी शिक्षक संघ (थोरात गट) पुरस्कृत स्वाभिमानी शिक्षक मंडळाला संघाच्या शि. द. पाटील (धैर्यशील पाटील) गटासह जुनी पेन्शन संघटना, आदर्श शिक्षक समिती, दिव्यांग कर्मचारी शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक भारती संघटनेसह बारा संघटनांनी पाठिंबा दिला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातीलही 1091 मतदान नोंद झाले होते.

मिरजेच्या शेतकरी भवन येथे सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजता पहिली फेरी पूर्ण झाली. पहिल्या फेरी अखेर स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या पॅनेलचे 21 जण सहाशे ते आठशे मतांनी आघाडीवर होते. दुसर्‍या फेरीमध्ये सोलापूर जिल्ह्याची मतमोजणी झाली. यामध्ये सत्ताधारी पॅनेलला जास्त मते मिळाली. सत्ताधारी पॅनेलला जास्त मते मिळूनही पहिल्या फेरीतील आघाडीमुळे विरोधी पॅनेल विजयी झाले. पहिल्या फेरीतील आघाडी बघूनच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मतमोजणी ठिकाणी आतषबाजी केली. विजयी घोषित झाल्यानंतर ढोलताशा व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

उमेदवारांना मिळालेली मते –
अनुसूचित जाती (जिल्हा राखीव) : किशोर कांबळे – 2384, अमोल माने – 3044, विकास वायदंडे – 482. इतर मागास वर्ग : फत्तू नदाफ – 3282, सुरेश पाटील – 2646, भटक्या जाती व जमाती विशेष मागास वर्ग : सचिन खरमाटे – 3138, सुरेश नरुटे 2786, महिला राखीव : रुपाली गुरव 3166, अनिता काटे 3102, प्रियांका पाटील 2654, रागिणी पाटील 2729. कडेगाव : संजय महिंद – 3226, राजू शेख -2699. पलूस : नितीन चव्हाण – 3179, प्रदीप मोकाशी – 2742. कवठेमहांकाळ : मनोज कोळेकर – 2705, अजित पाटील – 3214. शिराळा : अशोक घागरे – 3163, अरूण पाटील – 2764. आटपाडी : शरद चव्हाण – 3212, हैबत पावणे – 2707. तासगाव : श्रीकांत पवार – 2993, कृष्णा पोळ – 3043, श्रीकांत शिंदे – 2437, शब्बीर तांबोळी – 3121. वाळवा : शिवाजी जाधव – 3063, राहुल पाटणे – 3182, नीता पाटील – 2598, सुरेश पाटील – 2481, चंद्रशेखर क्षीरसागर – 268. खानापूर : धनाजी घाडगे – 3039, संतोष जगताप -3057, महेश शरनाथे -2901, राजाराम शिंदे -2699. जत : गांधी चौगुले – 3077, धरेप्पा कट्टीमणी -2633, दयानंद मोरे -2696, विनायक शिंदे – 3173. मिरज : रामचंद्र देशमाने – 2710, कुबेर कुंभार – 2659, संगीता महाजन -2535, मिलिंद नागणे-3181, शामगौडा पाटील -3035, अमोल शिंदे -3388.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news