

सांगली : पुढारी वृत्तसेवा
तुमचा कल कुठे आहे? तुम्हाला रस कशात आहे? तुमच्या क्षमता कुठल्या क्षेत्राला पूरक आहेत? ही सगळी करिअरशी, रोजगाराशी निगडित प्रश्न आहेत. करिअर विषयक सर्वच प्रश्नांची उत्तरे एकाच छताखाली मिळावीत यासाठी दै. 'पुढारी' ने एक अत्यंत उपयुक्त ठरेल असे 'एज्यु दिशा 2022' हे भव्य शैक्षणिक प्रदर्शन व ज्ञानसत्र दि. 10 ते 12 या कालावधीत सांगलीत राम मंदिर कॉर्नर येथील कच्छी जैन भवनमध्ये आयोजित केले आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत करिअर संधीचे नवे दालन शुक्रवार दि. 10 पासून खुले होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
शुक्रवार दि. 10 रोजी पहिल्या सत्रात सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाने प्रदर्शनास प्रारंभ होईल. दुपारी 12.20 ते 12.40 या वेळेत संजय घोडावत विद्यापीठाचे विनायक भोसले यांचे प्रेरणादायी भाषण होणार आहे. त्यानंतर संजय घोडवत विद्यापीठचे डॉ. अरूण पाटील यांचे 'उच्च शिक्षणाचे महत्व, आव्हाने आणि संधी' या विषयावर व्याख्यान होईल. नंतर तीन तासांच्या अवकाशानंतर 4 ते 5 या वेळेत 'कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधील करिअरच्या संधी' या विषयांवर एमआयटी एडीटीचे नागेश जाधव हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर पुणे येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठचे डॉ. राकेश आफरे यांचे 'इंजनिअर कसे घडतात' या विषयावर व्याख्यान होईल.
शनिवार दि.11 रोजी सकाळी 11 ते 12 दरम्यान, सिंबॅसिस स्किल्स अॅण्ड
प्रोफेशनल युनिर्व्हसिटी, पुण्याचे प्रा. अमिर शिकलगार हे 'कौशल्यावर आधारित शिक्षण : 21 व्या शतकातील करिअरच्या संधी' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. नंतर लगेचच 12 ते 1 यावेळेत पुण्यातील नामवंत युनिक अॅकॅडमीचे प्रा. पी. डी. चव्हाण हे 'एमपीएसी आणि युपीएसी मधील करिअरच्या संधी' या अत्यंत महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी 4 ते 5 या सत्रात यशोधा ग्रुप ऑफ इस्टिट्यूट, साताराचे प्रा. रणधीरसिंह डी. मोहिते यांचे 'व्यवस्थापन शिक्षण आणि करिअरच्या संधी' या विषयावर व्याख्यान होणार आहे. लगेचच 5 ते 6 दरम्यान, अमित क्षेत्री फ्रेम बॉक्स, पुणे 'अॅनिमेशनमधील करिअरच्या संधी' या विषयावर मार्गदर्शन करतील.
रविवार दि. 12 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत 'परदेशी शिक्षण आणि करिअरच्या संधी' या विषयातील ज्येष्ठ तज्ज्ञ प्रा. जयंत पाटील हे कोणत्या देशात कोणकोणत्या शिक्षणाच्या संधी आहेत, त्याबद्दल तपशीलवार माहिती देणार आहेत. दुपारी 12 वाजता व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था,पेठ-इस्लामपूर या संस्थेचे संचालक महेश बी. जोशी यांचे 'डिप्लोमा व इंजिनिअरींगमधील भविष्यातील वाटचाली' या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान होईल. सायंकाळी 5 ते 6 या वेळेत 'नीटची तयारी कशी करावी', या विषयावर आयआबी पीसीसी लातूर, नांदेड, पुणे संस्थेचे प्रा. चिराग सेन्मा मार्गदर्शन करणार आहे. लगेचच 6 ते 7 यावेळेत 'नीट/ जीईई' या विषयावर प्रा. मोटेगांवकरसर यांचे आरसीसी क्लासेस लातूर येथील प्रा. एम. के. कुरणे हे मार्गदर्शन करणार आहेत.
नामांकित संस्थांबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्र, व्याख्याने प्रदर्शन काळात आयोजित केली आहेत. प्रदर्शनामध्ये एमपीएससी, युपीएससी तयारी, आयटी मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा व संधी, इंजिनिअरिंगमधील नव्या संधी, फिशरीज, नॅनोटेक्नॉलॉजी तसेच उज्ज्वल करिअरसाठी कोरोनानंतरच्या विविध नव्या संधी या विषयावर विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. या व्याख्यानामधून विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन होणार आहे.