सांगली : पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश, पाठ्यपुस्तके

सांगली : पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश, पाठ्यपुस्तके
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सर्व मुली आणि एससी, एसटी व आर्थिक मागास असलेल्या 71 हजार961 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी चार कोटी 31 लाख 76 हजार 600 रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे.
दरम्यान, पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुदानित असलेल्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहे. आतापर्यंत तालुकास्तरावर सुमारे 88 टक्के पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे दि. 13 जूनपासून नवीन गणवेश, पाठ्यपुस्तके आणि फूल देऊन विद्यार्थ्यांचे वाजत- गाजत जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद होत्या. अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. आता कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने शाळेतील येणार्‍या मुलांसाठी जय्यत तयारी केली आहे. पहिली ते सातवी पर्यंतच्या 71 हजार 903 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्व मुलींचा समावेश असून 59 हजार 185 मुली आहेत. एसटीची 335 मुले, एससीचे 9 हजार 54 मुले तर आर्थिक मागास असलेल्या 3 हजार 387 मुलांचा समावेश आहे. त्यासाठी 4 कोटी 31 लाख 76 हजार 600 रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीमार्फत हे गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

दरम्यान, पहिली ते आठवी पर्यंतच्या अनुदानित शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. त्यानुसार आतापर्यंत 87 टक्के पाठ्यपुस्तक तालुकास्तरावर देण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील सुमारे दोन हजार 346 शाळांना ही पुस्तके देण्यात येणार आहेत. 13 ते 30 जून यादरम्यान शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांच्यामार्फत जनजागृती केली जात आहे. शाळा व्यवस्थापन समिती, सामाजिक संस्था, बचत गट, विविध मंडळे यांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आलेला आहे. अधिकार्‍यांना शाळा भेटीचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news