सांगली : टेम्पो उलटून मणेराजुरीचा युवक ठार

सांगली : टेम्पो उलटून मणेराजुरीचा युवक ठार

नागज; पुढारी वृत्तसेवा :  विजापूर – गुहागर राज्यमार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील जांभूळवाडी गावाजवळ टेम्पो उलटून झालेल्या
अपघातात तरुण ठार झाला. मनोज मोहन जाधव (वय 17, रा. मणेराजुरी, ता. तासगाव) असे त्या युवकाचे नाव आहे. शनिवारी दुपारी हा अपघात झाला.

मनोज हा कुंभारी येथे कुस्ती प्रशिक्षक होता. शनिवारी तो दोन मित्रांसोबत मोटारसायकलीने आरेवाडी येथील बिरोबा बनात देवदर्शन घेण्यासाठी आला होता. देवदर्शन करून परत जाताना तो मोटारसायकलवरून न जाता एका टेम्पोत बसून कुंभारीला निघाला. दरम्यान, चोरोचीपासून अडीच किलोमीटर अंतरावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पो पलटी झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर टेम्पोचालकाने पलायन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news