

सांगली : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रारुप प्रभाग रचना निवडणूक विभागाने गुरुवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात नव्याने आठ जिल्हा परिषद मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. नव्याने करण्यात आलेल्या मतदारसंघामध्ये निंबवडे, वाळेखिंडी, करंजे, कवठेएकंद, सावंतपूर, बहादूरवाडी, सागाव, हरिपूर आणि नांद्रे या मतदारसंघाचा समावेश आहे.
दरम्यान, दरीबडची, बनाळी, कामेरी, येलूर, समडोळी या जुन्या जिल्हा परिषद मतदारसंघात बदल करून नेर्ले कुरळप, करजगी आणि माडग्याळ हे मतदारसंघ नव्याने करण्यात आले आहेत.सात महिन्यांपासून उत्सुकता लागलेली जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणाची प्रारूप प्रभाग रचना गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. नवीन मतदारसंघ तयार करताना शेजारच्या गटाची फोडाफोड झाली आहे. त्यामुळे अनेकांची राजकीय गणिते बदलली आहेत. पाच मतदारसंघ रद्द करून नव्याने गट तयार केले आहेत.
वाळवा तालुक्यात येलूर मतदारसंघ रद्द तर, पेठ मतदारसंघ फोडल्याने महाडिक गटाला धक्का बसल्याचे मानले जात आहे. नव्या आराखड्यानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 60 वरून 68 सदस्य तर, पंचायत समितीचे 120 वरून 136 सदस्य होतील. प्रभाग रचनेवर 2 ते 8 जून या कालावधीत हरकती व सूचना मांडता येतील. त्यानंतर विभागीय आयुक्त यांच्याकडून अंतिम प्रभाग रचना 22 जूनला निश्चित होईल. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना 27 जूनरोजी प्रसिद्ध होणार आहे.
आटपाडी तालुका : दिघंची, आटपाडी, करगणी, निंबवडे, खरसुंडी, जत तालुका : जाडरबोबलाद, उमदी, करजगी, माडग्याळ, शेगाव, वाळेखिंडी, डफळापूर, मुचंडी, खानापूर तालुका : नागेवाडी, लेंगरे, करंजे, भाळवणी, कडेगाव तालुका : तडसर, कडेपूर, वांगी, देवराष्ट्रे.
तासगाव तालुका : मांजर्डे, सावळज, चिंचणी, विसापूर, येळावी, कवठेेएकंद, मणेराजुरी, कवठेमहांकाळ तालुका : ढालगाव कुची, देशिंग, रांजणी. पलूस तालुका : कुंडल, सावंतपूर, दुधोंडी, अंकलखोप, भिलवडी. वाळवा तालुका : रेठरेहरणाक्ष, बोरगाव नेर्ले, कासेगाव, वाटेगाव, पेठ, वाळवा, कुरळप, चिकुर्डे, बावची, बहादूरवाडी, बागणी. शिराळा तालुका : पणुंब्रेतर्फ वारूण, वाकुर्डे बुद्रुक, कोकरूड, सागाव, मांगले. मिरज तालुका : भोसे, एरंडोली, मालगाव, कवलापूर, बुधगाव, नांद्रे, कसबे डिग्रज, कवठेपिरान, हरिपूर, म्हैसाळ, बेडग या मतदारसंघाचा समावेश होते.
नव्याने तयार झालेल्या आटपाडी तालुक्यात निंबवडे जिल्हा परिषद मतदारसंघात निंबवडे आणि घरणकी, जत तालुक्यातील करजगी जिल्हा परिषद मतदारसंघात करजगी आणि तिकोंडी, माडग्याळ जिल्हा परिषद मतदारसंघात माडग्याळ आणि दरीबडची, पूर्वी दरीबडची या नावाने जिल्हा परिषदेचा स्वतंत्र मतदारसंघ होता. वाळेखिंडी जिल्हा परिषद मतदारसंघात वाळेखिंडी आणि कोसारी. तासगाव तालुक्यात नव्याने तयार झालेल्या कवठेएकंद जिल्हा परिषद मतदारसंघात कवठेएकंद आणि कुमठे, कवठेमहांकाळ तालुक्यात रांजणी जिल्हा परिषद गटात रांजणी आणि हिंगणगाव. पलूस तालुक्यात सावंतपूर जिल्हा परिषद मतदारसंघात बांबवडे आणि सावंतपूर. नेर्ले जिल्हा परिषद मतदारसंघात साखराळे आणि नेर्ले हे दोन पंचायत समितीचे गण तयार झालेले आहेत. कुरळप जिल्हा परिषद मतदारसंघात कुरळप आणि ऐतवडे बुद्रुक हे दोन गण तयार झालेले आहेत.
बहादूरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात बहादूरवाडी आणि कोरेगाव हे दोन पंचायत समितीचे गण तयार झालेले आहेत. सागाव जिल्हा परिषद मतदारसंघात कणदूर आणि सागाव असे दोन पंचायत समितीचे गण तयार करण्यात आलेले आहेत. हरिपूर जिल्हा परिषद मतदारसंघात हरिपूर आणि टाकळी हे दोन पंचायत समितीचे गण तयार झालेले आहेत. नांद्रे जिल्हा परिषद मतदारसंघात नांद्रे आणि कर्नाळ हे दोन पंचायत समितीचे गण तयार झालेले आहेत.
जिल्ह्यात नवीन मतदारसंघ करताना शेजारील दोन मतदारसंघातील फोडाफोडी करण्यात आली आहे. याशिवाय जुना मतदारसंघाचे नाव बदलून नवीन गावे घेण्यात आली आहेत. तब्बल पन्नासहून अधिक मतदारसंघाची फोडाफोडी झाल्याचे दिसून येते. बदललेल्या आणि फुटलेल्या मतदारसंघामुळे अनेक इच्छुकांची मात्र चांगलीच गोची झाली. जिल्ह्याची राजकीय स्थिती पाहिली, तर तालुकानिहाय पक्षीय पातळीवर राष्ट्रवादीचा दबदबा दिसून येतो. जिल्ह्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांची महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात खर्या अर्थाने लढत राहणार आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजपची ताकद कमी असल्याचे दिसते.
राज्य निवडणूक आयोगाकडील सूचनांनुसार प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे कक्ष तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या 10 पंचायत समित्यांचा निवडणूक विभाग व निर्वाचक गण यांच्या हरकती व सूचना ग्रामपंचायत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत 8 जून पर्यंत दाखल करता येणार आहेत.
निंबवडे, नांद्रे, बहादूरवाडी, कुरळप, नेर्ले, सागाव, कवठेएकंद, सावंतपूर, वाळेखिंडी, करजगी, माडग्याळ, करंजे यांचा समावेश आहे. दरम्यान, दरीबडची, बनाळी, कामेरी, येलूर, समडोळी हे मतदारसंघ आता असणार नाहीत.