सांगली : कुपवाडमध्ये दोन गटात तलवार हल्ला

सांगली : कुपवाडमध्ये दोन गटात तलवार हल्ला
Published on
Updated on

कुपवाड; पुढारी वृत्तसेवा :  व्यावसायिक वादातून व मागील भांडणाच्या रागातून कुपवाड एमआयडीसीतील रस्त्यावर दोन गटात झालेल्या तलवार हल्ल्यात दोन्ही गटातील चारजण जखमी झाले आहेत. जखमीवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुपवाड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन काही जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : कुपवाड -मिरज एमआयडीसी रस्त्यालगत असलेल्या काशिलिंग सप्लायर्स दुकानासमोर गुरुवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवशक्तीनगर व एमआयडीसीतील वीट, वाळू, खडी व्यवसायातील दोन गटात व्यावसायिक वादातून व मागील भांडणाच्या रागातून झालेल्या तलवार हल्ल्यात दोन्ही गटातील चारजण जखमी झाले आहेत. यातील एका गटाच्या चारचाकी (एम.एच.10 सी.एन.5166) च्या पुढील व पाठीमागील बाजूच्या काचा फोडून वाहनांचे नुकसान केले
आहे.

हल्ल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांनी पोलिस कर्मचार्‍यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गर्दीला पांगवून जखमींना मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमीमध्ये दोन्ही गटातील चारजणाचा समावेश आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तातडीने काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने कुपवाड शहरासह एमआयडीसीत खळबळ माजली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news