सांगली : कस्तुरी क्लबतर्फे सहलीचे आयोजन

सांगली : कस्तुरी क्लबतर्फे सहलीचे आयोजन
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  दररोजच्या रुटीन कामांमधून एक छोटा ब्रेक सर्वांनाच हवा असतो. ब्रेक म्हणून आपण सहलीला गेलो तर? आहे ना छान कल्पना..! महिलांना स्वयंपाक, घरकाम यातून थोडासा निवांतपणा देण्यासाठी कस्तुरी क्लबने सहलीचे आयोजन केले आहे.

'पुढारी' कस्तुरी क्लब तर्फे 27 व 28 फेब्रुवारी रोजी गोवा येथे एक दिवस मुक्कामी सहल असणार आहे. यासाठी पार्थ हॉलिडेज् सांगली यांचे सहकार्य लाभले आहे. गोव्यामधील छान निसर्गरम्य वातावरण, वेगवेगळे समुद्रकिनारे, ओल्ड गोवा चर्च, मंगेश देऊळ तसेच विविध प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊन तेथील आनंद लुटण्याची ही सुवर्णसंधी महिलांना मिळत आहे. सभासदांसाठी फी रुपये 2800 असून, इतर महिलांसाठी फी रुपये 3000 आहे. सहल लिमिटेड मेंबर्ससाठी असून, प्रथम बुकिंग करणार्‍यास प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंग करण्यासाठी 9607957576 या नंबरवर संपर्क साधावा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news