सांगली : इस्लामपुरात आज रंगणार खेळ पैठणीचा

सांगली : इस्लामपुरात आज रंगणार खेळ पैठणीचा
Published on
Updated on

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  दै. पुढारी कस्तुरी क्लब व माजी नगरसेविका सौ. मनीषा जयवंत पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (आज) दि. 21 रोजी दुपारी 1 वाजता निर्मला सांस्कृतिक भवनमध्ये होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सभासद नोंदणी केली जाणार आहे. या कार्यक्रमाचा वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यातील सर्व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कस्तुरी क्लब संयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमात गप्पा, गाणी, नृत्य, विनोद, उखाणेसोबतच नवनवीन गेम्स अशा भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी महिलांना अँकर तेजस्विनी शहा सोबत मिळणार आहे. खेळ पैठणीच्या कार्यक्रमातून 3 विजेत्या महिलांना पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे. या पैठणीचे प्रायोजक अण्णा बुढ्ढे हॉटेलच्या स्मिता सांभारे व सीमा सांभारे आहेत.
दै. पुढारी कस्तुरी क्लबच्यावतीने 2021-22 लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यामधून दुल्हन-शहा फुलचंद भलाजी यांच्याकडून 10 सेमी पैठणी, माहेर फार्मिंग ज्वेलर्स कराड यांच्याकडून 1 ग्रॅमचे 5 सेट, राजेंद्र ज्वेलर्स यांच्याकडून 5 सोन्याच्या नथी, राजमाने फर्निचर यांच्याकडून 1 ड्रेसिंग टेबल अशी बक्षिसांची लयलूट होणार आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण

हा कार्यक्रम निर्मला सांस्कृतिक भवन महादेवनगर, इस्लामपूर पोलिस लाईनच्या पाठीमागे येथे दुपारी 1 वाजता होणार आहे. महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्कासाठी 7972724391

सभासद नोंदणी धुमधडाक्यात

दै. पुढारी विभागीय कार्यालयात कस्तुरी क्लबची सभासद नोंदणी गेल्या 15 दिवसांपासून धुमधडाक्यात सुरू आहे. सभासद होणार्‍या महिलांना बॉस कंपनीचा स्टेनलेस स्टील कॉपर कोटिंगचा थर्मास दिला जात आहे. तसेच भरपूर लकी ड्रॉ व डिस्काऊंट कुपनचा खजिनाही महिलांना मिळणार आहे. बुधवार, दि. 21 रोजी कार्यक्रमासाठी महिलांनी आपली नावे नोंदणी करून पैठणीचे मानकरी व्हा, असे आवाहन कस्तुरी क्लब संयोजकांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news