सांगली; पुढारी वृत्तसेवा : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप, नमूना ब दि. 26 जूनरोजी सर्व ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, गट विकास अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय स्तरावर तसेच वेब साईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
प्रभाग निहाय आरक्षण निश्चिती प्रारूप, नमुना ब बाबत हरकती व सुचना, संबधीत तहसीलदार यांच्याकडे कार्यालयीन वेळेत 27 जून ते 03 जुलै या कालावधीमध्ये दाखल करता येणार आहेत. हरकतींवर संबंधित उपविभागीय स्तरावर 7 जुलै रोजी अभिप्राय घेण्यात येवून त्यास 12 जुलैरोजी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर मान्यता देवून 14 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. विकास खरात यांनी दिली.
मिरज – का. खोतवाडी, निलजी, बामणी, वाजेगाव. तासगाव – चिखलगोठण, बिरणवाडी. जत – गुलगुंजनाळ, को. बोबलाद, कोणबर्गी, बिळूर, खिलारवाडी. कवठेमहांकाळ – बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, धुळगाव, घोरपडी, करोली टी, कोकळे, शिंदेवाडी (जी), ढोलेवाडी, ढालगाव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. खानापूर-विटा – देवनगर, भेंडवडे, साळशिंगे. आटपाडी – नेलकरंजी, वाक्षेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बनपुरी, करगणी, मुढेवाडी, निंबवडे, पूजारवाडी आ., विभूतवाडी, औटेवाडी, कानकात्रेवाडी. पलूस – राडेवाडी, आमणापूर, विठ्ठलवाडी. वाळवा – तांबवे, शिरटे, साटपेवाडी, कारंदवाडी. कडेगाव – वाजेगाव, चिंचणी वांगी. शिराळा – बांबवडे, वाकुर्डे बु., भाटशिरगाव, धसवाडी, करुगली, खुजगांव, मादळगाव, रांजणवाडी, रिळे, शिरशी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंगरूळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणी, मोरेवाडी, पं.त. वारूण, पाचगणी, मानेवाडी, कदमवाडी.