लवकरच एमआयडीसीची उभारणी : रोहित पाटील

लवकरच एमआयडीसीची उभारणी : रोहित पाटील
Published on: 
Updated on: 

कवठेमहांकाळ,  पुढारी वृत्तसेवा :  मतदारसंघात औद्योगिक क्रांती करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आणि मतदारसंघाचा चौफेर विकास करण्यासाठी तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर एमआयडीसी उभारण्याची घोषणा रोहित पाटील यांनी केली.

विठुरायाचीवाडी येथील अर्जुन गेंड यांची जिल्हा युवक राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.  गेंड यांचा आमदार सुमन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील आणि रोहित पाटील यांच्याहस्ते सत्कार झाला.

पाटील म्हणाले, मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळावे म्हणून मतदारसंघामध्ये एमआयडीसी व्हावी, असे स्व. आबांचे स्वप्न होते. लवकरच एमआयडीसीलाही मंजुरी मिळेल, असे आश्वासन पाटील यांनी दिले. संजय कोळी यांनी स्वागत केले.

माजी सभापती सुरेखा कोळेकर, ताजुद्दीन तांबोळी, अर्जुन यांनी मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्षा अश्विनी पाटील, दादासाहेब कोळेकर, महेश पवार, अमोल जाधव, अनिता आवळे, मीनाक्षी माने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news