म्हैसाळ आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर सोमवारपर्यंत कोठडी

म्हैसाळ
म्हैसाळ

मिरज; पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ (ता. मिरज) येथील नऊ जणांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी बुधवारी आणखी तिघा संशयितांना अटक केली. एकूण 25 पैकी 18 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. उर्वरित सात संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये शामगोंडा कलगोंडा पाटील (वय 54, रा. गाडवे चौक, मिरज), राजेश गणपती होटकर (वय 54, रा. विद्यानगर, विश्रामबाग) आणि अण्णासाहेब तात्यासाहेब पाटील (वय 69, रा. म्हैसाळ) यांचा समावेश आहे.

खासगी सावकारांच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून पशुवैद्यकीय डॉ. माणिक वनमोरे व पोपट वनमोरे या दोघा सख्ख्या भावांनी आपल्या कुटुंबियांसह विषारी द्रव्य प्राशन करून सामूहिक आत्महत्या केली होती.

घटनास्थळी पोलिसांना दोन चिठ्ठ्या मिळाल्या आहेत. त्यामध्ये वनमोरे बंधूंनी 25 खासगी सावकारांची नावे व त्यापुढे काही सांख्यिकी आकडेवारी नमूद केली आहे.

पोलिसांनी आतापर्यंत नंदकुमार रामचंद्र पवार, राजेंद्र लक्ष्मण बन्ने, अनिल लक्ष्मण बन्ने, खंडेराव केदारराव शिंदे, डॉ. तात्यासाहेब अण्णाप्पा चौगुले, शैलेंद्र रामचंद्र धुमाळ, प्रकाश कृष्णा पवार, संजय इराप्पा बागडी, अनिल बाळू बोराडे, पांडुरंग श्रीपती घोरपडे, विजय विष्णू सुतार, शिवाजी लक्ष्मण कोरे, रेखा तात्यासाहेब चौगुले, गणेश ज्ञानू बामणे, शुभदा मनोहर कांबळे या पंधरा संशयित सावकारांना अटक केली आहे.

बुधवारी कलगोंडा पाटील, राजेश होटकर आणि अण्णासो पाटील या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उर्वरित अन्य संशयितांना देखील लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सीसीटीव्हीची तपासणी

म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. डॉ. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे यांच्या घराकडे कोण कोण येत होते. याची सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठीच पोलिसांची वेगवेगळे सात पथके तयार करण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news