मिरजेत दुचाकींच्या धडकेत एक ठार; दोघे गंभीर

मिरजेत दुचाकींच्या धडकेत एक ठार; दोघे गंभीर

मिरज; पुढारी वृत्तसेवा :  मिरज-मालगाव रस्त्यावर दोन मोटारसायकलींची जोरदार धडक झाल्याने एक ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात शीतल धनपाल नांद्रे (वय 40, रा. पाण्याच्या टाकीजवळ, मालगाव) यांचा मृत्यू झाला. तर सुनील तमान्ना आवळे आणि बाळासाहेब शामराव कुलकर्णी हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघातप्रकरणी संतोष धनपाल नांद्रे यांनी बाळासाहेब शामराव कुलकर्णी (रा. सुभाषनगर) याच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत शीतल नांद्रे आणि सुनील आवळे हे दोघे मोटारसायकलवरुन चिपरी येथे गेले होते. तेथून शनिवारी दुपारी 4 वाजता मालगावकडे परतत असताना शेजारून बाळासाहेब कुलकर्णी यांच्या भरधाव मोटारसायकलने (एमएच 12 जीवाय 6628) जोरदार धडक दिली. त्यामुळे तिघेही मोटारसायकलवरुन कोसळले. या अपघातात शीतल नांद्रे आणि सुनील आवळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news