जत : सशाची शिकार करणाऱ्या एका संशयित आरोपीस अटक

सशाची शिकार
सशाची शिकार
Published on
Updated on

जत ; पुढारी वृत्तसेवा साळमाळगेवाडी (ता.जत) पाटील- पडवळे वस्तीलगतच्या वनहद्दीत सश्याची शिकार करत असताना एका संशयितास अटक केली आहे. हलाप्पा धुंदाप्पा बेरड (रा. ब्याकुड. अल्कणुर ता. रायबाग. जि. बेळगाव) असे त्‍याचे नाव आहे. यातील अजून सहा आरोपी फरार असून, ते कर्नाटकातील आहेत.

हलाप्पा बेरड याच्याकडून मृतावस्थेतील दोन ससे ताब्यात घेतले आहेत. तसेच तीन मोटरसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई वनविभागाने (शनिवार) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास केली. रात्री उशिरापर्यंत फरार आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू होतं.
याबाबत अधिक माहिती अशी की, साळमळगेवाडी येथील पाटील व पडवळे वस्त्यालगत वन विभागाचे वन आहे. या परिसरात कर्नाटकातील काहीजण वन्य प्राण्यांची शिकार करत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्‍यानुसार वनविभागाने वन हद्दीत छापा टाकला असता, वन विभागाच्या काही अंतरावरच एका शेततळ्याजवळ संशयित सातजण वण्यप्राण्यांची (ससा) शिकार करत असताना दिसून आले.

यावेळी संशयित आरोपी हलाप्पा बेरड यास वन विभागाने ताब्यात घेतले. दरम्यान यातील सहाजण पळून जाण्यात यशस्‍वी ठरले. मात्र त्यांच्या मोटरसायकली तिथेच टाकून गेल्‍याने त्‍या जप्त करण्यात आल्‍या आहेत. रात्री उशिरा हलाप्पा बेरड या संशयित आरोपीसह सात जणांवर वनविभागाने भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्यव्ये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वनक्षेत्रपाल प्रविण दादासो पाटील ,वनरक्षक गणेश दुधाळ, प्रकाश गडदे , माधव मुसळे, निलेश क्षरबिद्रे यांनी केली आहे.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news