ऊस दरप्रश्नी लक्षवेधी मांडणार : आमदार बच्चू कडू

ऊस दरप्रश्नी लक्षवेधी मांडणार : आमदार बच्चू कडू
Published on
Updated on

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्रातील साखरसम्राट शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत. त्यामुळे याबाबत मी विधानसभेत लक्षवेधी मांडणार आहे. कारखानदारांना आणखी 500 रुपये देण्यास भाग पाडू, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली. तेे शिराळा येथे आले असता आंदोलन अंकुशचे पदाधिकारी धनाजी चुडमुंगे यांनी त्यांची भेट घेऊन ऊस दराच्या धोरणातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या.

कडू म्हणाले, दर नियंत्रण मंडळाकडून उसाचा अंतिम दर ठरवताना बगॅसचे मूल्य 30 ऐवजी चाक टक्के धरून महसुली उत्पन्न काढले जाते. त्यामुळे शेतकर्‍यांना अंतिम दर प्रतिटन 700 रुपये कमी मिळतो. ही तरतूद सी. रंगराजन समितीने केलेल्या शिफारशी विरोधात आहे. त्यामुळे ऊस दराचे विनियमन अधिनियम 2013 च्या नियम 2016 मध्ये बगॅसचे मूल्य 30 टक्के धरण्याची दुरुस्ती करून घ्यावी लागेल. मशीन तोड वजावटचा निर्णय एकतर्फी आहे. ही वजावट दोन टक्केच्या खाली आणण्याची गरज आहे. सध्या साखर व उपपदार्थांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना आणखी 500 रुपये देणे गरजेचे आहे. प्रहारचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील, आंदोलन अंकुशचे जिल्हा उपाध्यक्ष उदय होगले, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, महेश जाधव, प्रमोद बाबर उपस्थित होते.

काट्याचे उद्घाटन लवकरच

आंदोलन अंकुशकडून शिरोळमध्ये उसाची काटामारी रोखण्यासाठी शेतकरी वजन काटा उभारला जात आहे. हा काटा येत्या हंगामात सुरू करणार आहे. याचे उद्घाटन आपण करावे, अशी मागणी धनाजी चुडमुंगे यांनी यावेळी केली. यावर कडू यांनी आवश्यक येवू, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news