Sangli Flood News : ग्रामीण भागात झेडपीची यंत्रणा अलर्ट

सीईओ : 110 ग्रामस्थ, 763 जनावरांचे स्थलांतर : पशुधनाच्या स्थलांतरास प्राधान्य
Sangli Flood News
सांगली जिल्हा परिषद Pudhari File Photo
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि पाण्याचा विसर्ग पाहता कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत अजून वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने ग्रामीण भागात जिल्हा परिषदेची यंत्रणा अलर्ट ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय रजा रद्द केल्या आहेत. सर्वांना मुख्यालयात थांबणे बंधनकारक केले आहे. तसेच महसूल आणि पोलिसाबरोबर समन्वयाने काम करण्याची सूचना दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार बैठकीत गुरुवारी दिली.

Sangli Flood News
सांगली : पूर आराखड्यासाठी संस्थांची मदत घ्या

त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील सुमारे 104 गावे बाधित होतात, त्यापैकी 30 गावांना जास्तीचा फटका बसतो. त्यामुळे या भागात उपयोजना करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर जबादारी निश्चित करण्यात आल्या आहेत. लोकांना आणि पशुधनाच्या स्थलांतराबाबत व्यवस्था केली आहे. पूर आल्यास एकूण 1 लाख 8 हजार 168 ग्रामस्थ तर 1 लाख 76 हजार 185 पशुधन बाधित होते. गुरुवारी दुपारपर्यंत शिराळा तालुक्यातील 57 ग्रामस्थांचे आणि 677 जनावरांचे तर वाळवा तालुक्यातील 53 ग्रामस्थ आणि 83 जनावरे अशी एकूण 110 ग्रामस्थांचे 763 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. वाहतुकीसाठी रस्ते बंद झाल्यास पशुधनाच्या स्थलांतरास अडचणी येते. त्यामुळे प्राध्यान्याने पशुधनाचे स्थलांतरित करा, पाणी पुरवठ्याची दररोज तपासणी करण्याची सूचना दिली आहे.

27 रस्ते, 15 पूल पाण्याखाली

त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यातील 27 रस्ते आणि 15 पूल पाण्याखाली गेले आहेत. तसेच ज्या भागात रस्ते, पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, पाणी वाढल्याची शक्यता आहे. पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या 55, महसूल प्रशासनाच्या 7 बोटी सज्ज आहेत.

Sangli Flood News
सांगली : साथ, पूर, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा

विजेच्या खाबांना फ्लॅगिंग करण्याची सूचना

सन 2019 च्या महापुविजेच्या खाबांना फ्लॅगिंग करण्याची सूचनारात वसगडे येथे मोठी दुर्घटना घडली होती. ज्यामध्ये नदी काठावरील पाण्याखाली गेलेल्या विजेच्या खांबाचा अंदाज न आल्याने बोट बुडाली होती, ज्यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला होता, अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी कोणती व्यवस्था करण्यात आल्याचे प्रश्न विचारला असता. नदी काठावरील विजेच्या खांबांना फ्लॅगिंग करण्याच्या सूचना महावितरण विभागाला देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news