सांगली : पूर आराखड्यासाठी संस्थांची मदत घ्या

सांगली : पूर आराखड्यासाठी संस्थांची मदत घ्या

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. तरीही आपत्ती व्यवस्थानाचे आराखडे तयार करताना प्रशासनास मदत करणार्‍या सामाजिक संस्था व धोरणात्मक सूचना करणार्‍या संस्थांची स्वतंत्रपणे यादी तयार करा. तसेच आपत्ती व्यवस्थापन बैठकांना या संस्थांना निमंत्रित करून त्यांच्या सूचनांप्रमाणे पुढील कार्यवाही करा, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोनाबाधितांना मदत आढावा बैठक उपसभापती डॉ. गोर्‍हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, आयुक्त नितीन कापडनीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले, अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, संभाव्य पूरपरिस्थिती पूर्वी पूरक्षेत्रातील नागरिकांना ग्रामस्थांना पूरपरिस्थितीत आवश्यक असणार्‍या वस्तूंच्या यादी प्रशासनाने तयार करून द्यावी. तसेच पूरपरिस्थितीत अधिकार्‍यांनी अधिक सजगपणे काम करावे. पूरपरिस्थितीच्या काळात अफवा पसरू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घ्या. तसेच जलसंधारण विभागाच्या पावसाच्या अद्ययावत माहितीसाठी जलसंपदा विभागाच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा.

आयुक्त कापडणीस म्हणाले, संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका सज्ज आहे. शहरात पॅचवर्कचे काम सुरू करण्यात आले आहे. आवश्यक ठिकाणी मुरुमाचे रस्ते करण्याची कार्यवाही सुरू आहे. धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. विभागनिहाय 247 पथके तयार करण्यात आली आहेत. शहरातील खुले भूखंड तसेच विनावापर मालमत्ता यांचीही सफाई करण्यात येणार आहे. निवारा केंद्रांचीही निश्चिती करण्यात आली आहे. शहरात 'आपत्ती मित्र' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत 200 जणांनी आपत्ती मित्र म्हणून नोंदणी केली असल्याची माहिती दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news