Sangli Crime | कवठेमहांकाळात खळबळ : तरुणाचा धारदार हत्याराने सपासप वार करून निर्घृण खून

अलकुड ते इरळी जाणाऱ्या रस्त्यापासून पश्चिमेला काही अंतरावर प्रकार; कोकळे येथील मृत तरूण
 Kavathe Mahankal  Youth Brutally Murdered
प्रणव कदमPudhari
Published on
Updated on

Kavathe Mahankal Youth Brutally Murdered

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एस) गावच्या हद्दीत २१ वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १९) पहाटे उघडकीस आली. प्रणव प्रकाश कदम (वय २१, रा. कोकळे, ता. कवठेमहांकाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे अलकुड आणि कोकळे परिसरात खळबळ उडाली असून, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अलकुड ते इरळी जाणाऱ्या रस्त्यापासून पश्चिमेला काही अंतरावर हा प्रकार घडला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्यापूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी प्रणव याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर, कपाळावर, मानेवर, पाठीवर तसेच हातावर वार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 Kavathe Mahankal  Youth Brutally Murdered
Sangli News : विश्रामबागमधील २२ गुंठे ओपन स्पेसचा बाजार

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. हल्ल्यासाठी कोणते हत्यार वापरण्यात आले, हल्लेखोरांची संख्या किती होती, प्रणव याला नेमके कोणत्या कारणातून लक्ष्य करण्यात आले आणि तो घटनास्थळी कसा पोहोचला, याचा शोध घेतला जात आहे.

प्रणव याचा कोणाशी वाद होता का, त्याचा पाठलाग करण्यात आला होता का किंवा अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला झाला, याबाबत विविध शक्यता व्यक्त होत आहेत. मात्र, पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच खुनामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

 Kavathe Mahankal  Youth Brutally Murdered
Sangli Crime: खुनी हल्ल्यातील जखमी पतीचाही मृत्यू

मृत प्रणवचे मामा दत्तात्रय युवराज पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news