Yashoda Kadam: कदम कुटुंबाची मायेची सावली हरपली! माजी आमदार मोहनराव कदम यांच्या पत्नी यशोदा कदम यांचे निधन

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाचे माजी आमदार मोहनराव श्रीपती कदम यांच्या पत्नी यशोदा कदम (वय ८०) यांचे आज (दि. १९) अल्पशा आजाराने निधन झाले.
Former MLA Mohanrao Kadam wife Yashoda Kadam
Former MLA Mohanrao Kadam wife Yashoda KadamPudhari Photo
Published on
Updated on

Yashoda Kadam

कडेगाव शहर : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाचे माजी आमदार मोहनराव श्रीपती कदम यांच्या पत्नी यशोदा कदम (वय ८०) यांचे आज (दि. १९) अल्पशा आजाराने निधन झाले. ‘आक्का’ या नावाने सर्वपरिचित असलेल्या यशोदा कदम यांच्या निधनाने सोनसळ, चिंचणीसह पलूस-कडेगाव मतदारसंघावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी १ वाजता चिंचणी (वाजेगाव) येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता सोनसळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

यशोदा कदम यांना काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत असल्याने पुणे येथील भारती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रारंभी त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, त्यानंतर प्रकृतीत चढ-उतार होत गेले. आमदार डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्यासह कुटुंबीय उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

Former MLA Mohanrao Kadam wife Yashoda Kadam
Sangli Accident: भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

भारती विद्यापीठाचे संस्थापक, महाराष्ट्राचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांच्या त्या वहिनी होत. कदम कुटुंबातील जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते त्यांनी आयुष्यभर जपले. मोठ्या कुटुंबातील नाती जपताना त्यांनी प्रेम, माया आणि आपुलकीचा आधार सर्वांना दिला.

माजी आमदार मोहनराव कदम यांच्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक वाटचालीत यशोदा कदम खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. राजकीय जीवनातील व्यस्तता सांभाळताना घर-कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलत त्यांनी मोहनराव कदम यांच्या सार्वजनिक जीवनाला भक्कम आधार दिला. त्यामुळे कदम कुटुंबाच्या राजकीय-सामाजिक प्रवासातील पडद्यामागचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांच्या निधनाने कदम कुटुंबाने प्रेमळ, कर्तव्यदक्ष आणि मायेची सावली देणारे व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सोनसळ, चिंचणीसह सोनहीरा पलूस-कडेगावच्या सामाजिक वर्तुळातही त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पती माजी आमदार मोहनराव कदम, मुलगा माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम कदम, मुलगी शोभाताई महाडिक, नातू कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. जितेश कदम, पंचायत समिती सदस्य दिग्विजय कदम, आदित्य कदम, हर्षवर्धन कदम यांच्यासह मोठा परिवार आहे.

Former MLA Mohanrao Kadam wife Yashoda Kadam
Sangli Theft: कडेगावातील चोरीचा छडा; चोरटा जेरबंद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news