सांगलीत आढळला पांढरा साप

सांगलीत आढळला पांढरा साप
Published on: 
Updated on: 

सांगली; पुढारी वृत्तसेवा : प्राणीमित्र स्वप्निल यादव यांनी बायपास रस्त्यावरील एका घरात पांढरा सर्प पकडला. इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर, जावेद शेख यांनी त्याला मानद वनाधिकारी अजित पाटील यांच्या ताब्यात देऊन निसर्गात मुक्त करण्यात आले.

हा साप कवड्या जातीचा असून मादी अंडी देऊन निघून जाते. यानंतर अंड्याला मिळणारी ऊब वातावरणातील बदलांमुळे कमी झाल्यास अंड्यातील सापामध्ये रंगद्रव्यांचा अभाव निर्माण होतो. अल्बिनीझम प्रक्रियेमुळे सापांच्या शरीरातील मेलॅनिनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांच्या त्वचेचा मूळ रंग हळूहळू नष्ट होतो. हा बिनविषारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news