Career Guidance: बारावीनंतर पुढे काय..? नामवंत तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन

दैनिक ‘पुढारी’च्यावतीने सांगली आणि ईश्वरपूरमध्ये आयोजन
Career Guidance
Career GuidancePudhari
Published on
Updated on

सांगली : बारावीचा महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतरच खऱ्याअर्थाने करिअरला दिशा मिळत असते. या वळणावर नेमक्या कोणत्या क्षेत्रात करिअर करावे? त्यासाठी कोणते विद्यापीठ, कॉलेज निवडावे? तिथे प्रवेश कसा घ्यावा? आपण निवडलेल्या कोर्ससाठी स्कॉलरशीप आणि शैक्षणिक कर्ज मिळेल का? मिळत असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे? या आणि अशा प्रत्येक प्रश्नाचे योग्य आणि सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी दैनिक ‘पुढारी’च्यावतीने आयोजित करण्यात येत आहे, खास करिअर गायडन्स सेमिनार. महाराष्ट्रातील १४ प्रमुख शहरांसोबत सांगली आणि ईश्वरपूर येथेही या सेमिनारचे आयोजन केले आहे.

सेमिनारमध्ये काय मिळणार?

सीईटी, कॅप राऊंडबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन ॲडमिशन प्रोसेसची संपूर्ण माहिती टॉप कोर्सेसबाबत माहिती करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती स्कॉलरशिप व शैक्षणिक कर्ज मार्गदर्शन तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून थेट कौन्सिलिंग तज्ज्ञांसोबत प्रश्नोत्तरे सत्र

वेगळेपण...

प्रवेश विनामूल्य प्रवेश प्रक्रियेवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन निवडक विद्यार्थ्यांना तीन विद्यापीठांना भेट देण्याची संधी प्रवेश प्रक्रिया ते कॉलेज निवडीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन स्कॉलरशीप व शैक्षणिक कर्ज प्रक्रियेबाबतसंपूर्ण मार्गदर्शन.

सांगली-ईश्वरपुरात आयोजन

हा करिअर गायडन्स सेमिनार ईश्वरपूर येथे १२ जून रोजी यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये, तर सांगलीमध्ये १४ जून रोजी कॉलेज कॉर्नर परिसरातील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या नूतन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी ९५७००१७००३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news