Vita Nagarparishad Election Result 2025: विट्यात 45 वर्षांचं पाटील गटाचे साम्राज्य खालसा, शिंदेशाहीचे पर्व सुरू

शिवसेना शिंदे गटाची बाजी; नगराध्यक्षपदासह २२ जागांवर मिळवला विजय, भाजपला चार जागांवर मानावे लागले समाधान
Vita Nagarparishad Election Result 2025: विट्यात 45 वर्षांचं पाटील गटाचे साम्राज्य खालसा, शिंदेशाहीचे पर्व सुरू
Published on
Updated on

Vita Nagarparishad Election Result 2025

विटा : पुढारी वृत्तसेवा

अतिशय कल्पकतेने आणि आक्रमकपणे राबवलेली प्रचार यंत्रणा आणि मतदारांनी दाखवलेल्‍या सकारात्मक विश्वासाच्‍या जोरावर विटा परिषदमध्ये ऐतिहासिक सत्तांतर घडले. आमदार सुहास आणि अमोल बाबर बंधूंनी नगराध्यक्ष आणि तब्बल २२ जागांवर विजय मिळवला आहे. विट्याच्या ४५ वर्षाहून अधिक काळ सत्तेत असणाऱ्या पाटील गटाला सत्तेतून पायउतार व्‍हावे लागले असून, भाजपच्या पाटील गटाला २६ पैकी केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

पारंपारिक बाबर विरुद्ध पाटील लढत

विटा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये यावेळीही पारंपारिक बाबर विरुद्ध पाटील गटांमध्ये लढत झाली. यावेळी ती शिवसेना शिंदे गट आणि भाजप अशी पक्षीय पातळीवर झाली. नगराध्यक्षपदासाठी ओबीसी महिला आरक्षण होते. यामध्ये भाजपच्या प्रतिभा अविनाश चोथे आणि शिवसेनेच्या काजल संजय म्हेत्रे यांच्यात लढत झाली. महायुतीच्याच राष्ट्रवादीने रोहिणी दिपक जंगम यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती. नगरसेवक पदाच्या २६ जागांसाठी तेरा प्रभागातून ६८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. चुरशीने तब्बल ३६ हजार ७७३ मतदान झाले होते.

Vita Nagarparishad Election Result 2025: विट्यात 45 वर्षांचं पाटील गटाचे साम्राज्य खालसा, शिंदेशाहीचे पर्व सुरू
Murgud Nagarparishad Result 2025 | मुरगुडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा 'करिश्मा'; सुहासिनीदेवी पाटील नगराध्यक्षपदी, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला

पहिल्‍या फेरीपासून म्‍हेत्रे यांची आघाडी

रविवारी सकाळी येथील बळवंत महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडीयमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीसाठी तेरा टेबल ठेवण्यात आले होते. प्रत्येक प्रभागातील एक मतदान केंद्रावरील मशीन एका फेरीत मतमोजणीसाठी घेण्यात आले. मतमोजणीच्या एकुण चार फेऱ्या झाल्या. यामध्ये पहिल्या फेरीपासून शिवसेनेच्या उमेदवार काजला म्हेत्रे यांनी प्रतिभा चोथे यांच्यावर आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत शिवसेनेच्या म्हेत्रे यांना ६३४ मतांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या फेरीत हे मताधिक्य जवळपास बाराशे पार पोहचले. यावेळी शिवसेनेच्या सोळापेक्षा अधिक जागा आघाडीवर होत्या. त्यामुळे विटा पालिकेची वाटचाल सत्तांतराकडे असल्याचे स्पष्ट झाले, यांत शिवसेनेने २२ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा एकूण २३ तर भाजपने ४ जागा जिंकल्या. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या काजल संजय म्हेत्रे यांनी भाजपच्या प्रतिभा अविनाश चोथे यांच्यावर तब्बल तीन हजार १९४ मतांनी मात केली.

Vita Nagarparishad Election Result 2025: विट्यात 45 वर्षांचं पाटील गटाचे साम्राज्य खालसा, शिंदेशाहीचे पर्व सुरू
Hupari Nagarparishad Result 2025 | हुपरी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा एकतर्फी विजय

शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्‍लोष

निकालानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवत आणि गुलाल उधळण करीत जल्लोष केला. या निवडणूकीत शिवसेनेचे नेते अमोल बाबर, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, माजी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, कृष्णात गायकवाड, माजी उपनगराध्यक्षा रूपाली धर्मेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे, विटा बँकेचे अध्यक्ष विनोद गुळवणी, माजी उपनगराध्यक्ष अॅड. अजित गायकवाड, महेश कदम यांना विजय मिळवला. तर माजी नगराध्यक्षा सुनिता भिंगारदेवे, माजी नगरसेवक पृथ्वीराज पाटील, संजय सपकाळ, पदमसिंह पाटील, माजी सभापती अरूण गायकवाड, माजी सभापती अविनाश चोथे, माजी नगरसेवक अमर शितोळे, सचिन शितोळे, प्रशांत कांबळे यांना पराभवाचा धक्का बसला.

Vita Nagarparishad Election Result 2025: विट्यात 45 वर्षांचं पाटील गटाचे साम्राज्य खालसा, शिंदेशाहीचे पर्व सुरू
Baramati Nagarparishad: बारामती नगरपरिषदेवर 41 पैकी 21 जागी महिलांना कर्तृत्व गाजवण्याची संधी

महायुतीमधील मित्र पक्षांमध्‍ये लढत

या निवडणूकीत सत्ताधारी भाजप आणि महायुतीचा घटकपक्ष असणाऱ्या शिवसेनेत जोरदार लढत पहायला मिळाली. विटा नगरपालिकेवर गेल्या जवळपास पन्नास वर्षांपासून माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाची एकहाती सत्ता राहिली आहे. यावेळी आमदार सुहास बाबर आणि शिवसेना नेते अमोल बाबर यांनी त्यांच्या सत्तेला शिवसेनेच्या माध्यमातून तगडे आव्हान दिले होते. चुरशीने मतदान झाल्यामुळे निकालाबाबत उत्सुकता लागून राहिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news