

विटा : विट्यात पोलीस प्रशासन कर्तव्यात कसूर करते म्हणून भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट महसूल विभाग प्रमुखांकडे म्हणजे तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली. आणि एक दिवशी लक्षणीय धरणे आंदोलनही केले.
येथील खानापूर रस्त्यालगतच्या भूमी अभिलेख कार्यालयासमोर सांगली जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आज मंगळ वारी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले. त्याचे झाले असे की, २५ ऑक्टोबर रोजी भर दुपारी १२ वाजता खानापूर तालुक्यातील करंजे येथे विट्याच्या भुमी अभिलेख कार्यालया तील मिलिंद वाघमारे हे जमीन (गट क्रमांक ४९५) मोजणीचे शासकीय काम करीत होते. तिथे गावातील कोंडीबा माने हा व्यक्ती तिथे आला आणि त्यांनी वाघमारे यांना दमदाटी केली. तसेच त्यांना मारण्याच्या उद्देशाने अंगावर धावून जात त्यांच्या हातातील शास कीय टॅब व दुचाकीची किल्ली काढून घेतली आणि पळून गेला.
याबाबत मिलिंद वाघमारे यांनी शासकीय कामात अडथळा आणून हातातील शासकीय टॅब काढून घेतल्या प्रकरणी करंजेतील कोंडीबा माने विरूद्ध विटा पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार कोंडीबा माने याच्यावर विटा पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. परंतु तीन दिवसांनंतरही संबंधित संशयित कोंडीबा माने याला अटक झालेली नाही, अगर त्याच्या कडील शासकीय टॅब परत मिळालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची मोजणी प्रकरणे रखडली आहेत. शिवाय शास कीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच आता अत्याधुनिक शासकीय मोजणी साहित्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
या टॅब मध्ये खानापूर तालुक्यातील विविध मोजणी प्रकरणा चा डाटा आहे. त्याचीही सुरक्षितता धोक्यात आली असा दावा करत प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्या ताब्यातील शास कीय मोजणी साहित्य परत मिळवून द्या या मागणीसाठी थेट आंदोलन करण्यात आले, याबाबत आता खानापूर तालुका महसूल विभागाचे प्रमुख म्हणून तहसीलदार योगेश टोम्पे यांना दिलेल्या निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनात अध्यक्ष अस्लम मुजावर, कार्याध्यक्ष विनोद पाटील, संदेश गणेशाचार्य, उपाध्यक्ष राहुल पाटील, रमेश पवार, संदीप पाखरे, संदीप हिरगुडे, अनिल सूर्यवंशी, रोहित शिर्के, झाकीर मुजावर, समर्थ बाजारी शंकर पाटील, शरद पाटील चंद्रकांत शेलार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.