सिद्धेश्वर कुरोली : पुढारी वृत्तसेवा
नोकरीला लावतो अशी फूस लावून एका तेवीसवर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना खटाव तालुक्यात घडली. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
मार्तंड भानुदास मोहिते (वय 52, रा. खेराडे वांगी, ता. कडेगाव) असे अटक केलेल्या मुख्य संशयिताचे नाव आहे. त्याला सहकार्य केल्याप्रकरणी वैभव पाटील (वय 38, रा. करगणी, ता. आटपाडी) व दीपाली अरविंद साठे (वय 41, रा. विटा) यांनाही अटक करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट रोजी एक महिला मायणी येथील दीपाली साठेच्या घरी पीडित महिलेला घेऊन गेली. तेथून दीपाली साठे व वैभव पाटील यांनी पीडितेला कडेगावला नेले. त्यानंतर दीपाली साठे व पीडित महिला एका हॉटेलमध्ये गेले. तेथे असलेल्या मार्तंड मोहिते याने पीडित महिलेवर अत्याचार केला.